Padma Awards 2026|'सुरांच्या राणी'चा सन्मान! अलका याज्ञिक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

Playback singer Alka Yagnik | संगीतातील अमूल्य योगदानाबद्दल अलका याज्ञिक यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने देऊन गौरव करण्यात आला
 Alka Yagnik
Delhi - playback singer Alka Yagnik awarded Padma Bhushan by President Droupadi Murmupudhari photo
Published on
Updated on

Bollywood singer Alka Yagnik Alka Yagnik awarded Padma Bhushan

पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथील सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. १९९० आणि २००० च्या दशकात त्यांनी अगणित हिट गाणी हिंदी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. 'खलनायक', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'ताल' यांसारख्या एकापेक्षा एक चित्रपटांमधील अविस्मरणीय गाण्यांना आपला स्वरसाज दिला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात आयोजित दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात पद्म पुरस्कार प्रदान केले. यामध्ये एकूण ६५ पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये २ पद्म विभूषण, ७ पद्म भूषण आणि ५६ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. पुरस्कारार्थींमध्ये गायिका अलका याज्ञिक, अभिनेते ममूटी, क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि आर. माधवन यांचा समावेश आहे.

अलका याज्ञिक या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय पार्श्वगायिकांपैकी एक मानल्या जातात. गेली अनेक दशके त्यांनी आपल्या मधुर आवाजाने कोट्यवधी संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत. अलका याज्ञिक यांनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांच्या अनेक गाण्यांनी लोकप्रियतेचे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या अलका याज्ञिक यांच्या नावावर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अलका याज्ञिक यांनी हा सन्मान अत्यंत नम्रतेने स्वीकारला.

 Alka Yagnik
Trisha Krishnan unfollow Vijay? त्रिशाने विजय यांना इन्स्टावर केलं अनफॉलो? बर्थडेच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत; चर्चांना पुन्हा उधाण

दरम्यान, राष्ट्रपती भवनात झालेल्या या सन्मान सोहळ्यानंतर अलका याज्ञिक यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय संगीतविश्वातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून मिळालेला हा पद्मभूषण पुरस्कार त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.

 Alka Yagnik
Tamilnadu CM Joseph Vijay |'अभिनेत्याचा पक्ष' म्हणून हिणवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर, विजय यांचा 'सिनेमॅटिक' व्हिडिओ व्हायरल

आर. माधवन

अभिनेते आर. माधवनला भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टी (हिंदी आणि तमिळ), चित्रपट निर्मितीमधील त्याचे उत्कृष्ट योगदान आणि कला क्षेत्रातील त्याच्या दैदीप्यमान प्रवासासाठी राष्ट्रपती भवनात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news