Rajesh Sharma health update: राजेश शर्मा यांना प्रकृती गंभीर असतानाही तत्काळ रुग्णालयात का नेले नाही? AICWAने केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rajesh Sharma health update: राजेश शर्मा यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात का नेले नाही? AICWAने उच्चस्तरीय चौकशीची केली मागणी
Rajesh Sharma
Rajesh Sharma health updatepudhari photo
Published on
Updated on
Summary

प्रभासच्या बहुचर्चित 'फौजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते राजेश शर्मा यांच्या प्रकृतीशी संबंधित घडलेल्या घटनेने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने गंभीर भूमिका घेत, संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांच्या प्रकृतीसंदर्भातील चित्रपटसृष्टीत चिंता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, दिग्दर्शक हनु राघवपुडी यांच्या प्रभास स्टारर आगामी 'फौजी' चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे सुरू असताना राजेश शर्मा यांची प्रकृती अचानक बिघडली होती. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी कोलकाताला हलवण्यात आले असून ते सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. या घटनेनंतर चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान कलाकारांच्या सुरक्षिततेसह वैद्यकीय सुविधांच्या उपलब्धतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन' (AICWA) ने केली आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, असोसिएशनने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. राजेश शर्मा यांच्या प्रकृती बिघडण्यामागील परिस्थितीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

शूटिंगच्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या का, तसेच प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तत्काळ हैदराबादमधील नामांकित रुग्णालयात का दाखल करण्यात आले नाही, असे प्रश्नही AICWA ने उपस्थित केले आहेत. याशिवाय, निर्मिती संस्थेने सुरक्षितता, स्वच्छता आणि वैद्यकीय नियमांचे पालन केले होते का, याचीही तपासणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Rajesh Sharma
Arbaz Shaikh: 'माझ्या बापाला वाचवा...'; 'सैराट' फेम अरबाज शेख ढसाढसा रडला; रुग्णालयावर केले गंभीर आरोप, मदतीसाठी भावनिक साद

असोसिएशनच्या मते, कलाकार, तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित कार्यस्थळ उपलब्ध करून देणे ही निर्मिती संस्थांची कायदेशीर तसेच नैतिक जबाबदारी आहे. अनेक चित्रपटांच्या सेटवर स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचा दावा AICWA ने केला आहे. रोजगारावर परिणाम होण्याच्या भीतीमुळे अनेक कर्मचारी अशा समस्या उघडपणे मांडण्यास टाळाटाळ करतात, असेही असोसिएशनचे म्हणणे आहे. चौकशीत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी. तसेच 'फौजी' चित्रपटाच्या निर्मात्यांनी राजेश शर्मा यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलावा आणि ते पूर्णपणे बरे होईपर्यंत सर्वोत्तम वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, शूटिंग दरम्यान कीटक चावल्याने राजेश शर्मा यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने पश्चिम बंगालमधील ढाकुरिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्री सुदीपा चॅटर्जी यांनी सर्वप्रथम त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती.

Rajesh Sharma
Satluj Controversy: दिलजीत दोसांझच्या अडचणी वाढल्या... सतलज प्रकरणात वेगळा ट्विस्ट, भारत सरकारची तपासासाठी उच्चस्तरीय समिती

कोण आहेत राजेश शर्मा?

अभिनेते राजेश शर्मा यांनी चित्रपट आणि छोट्या पडद्यावर देखील काम केलं आहे. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'चे पदवीधर असलेले राजेश शर्मा यांनी 'खोसला का घोसला', 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'पीकू', 'स्पेशल 26', आणि 'मर्दानी 2'सह अनेक गाजलेल्या चित्रपटांत अभिनयाची छाप उमटवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news