

Satluj Controversy Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझचा नवा चित्रपट 'सतलज' झी ५ ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला. आता यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. या प्रकरणात आता वेगळा ट्विस्ट आला असून भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटाच्या कंटेटबाबत तपास करण्यासाठी उत्तस्तरीय अंतरविभागीय समिती स्थापन केली आहे. समोवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सतलजच्या झी ५ वरील प्रसारणावर बंदी घालण्याचे निर्देश दिल्याची बाब समोर आली होती.
आधी सतलज हा चित्रपट पंजाब ९५ या नावानं थिएटरमध्ये रिलीज होणार होता. तो सीबीएफसीच्या सर्टिफिकेटच्या प्रतिक्षेत होता. मात्र शेवटी निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला होतो. त्यांनी झी ५ वर हा रिलीज केला. मात्र शुक्रवारी रिलीजनंतर ४८ तासात रविवारी हा चित्रपट प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला.
दिलजीत दोसांझ यांच्या सतलज चित्रपटाच्या कंटेटची चौकशी करण्यासाठी एक विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सतलजची स्टोरी ही पंजाबचे मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या गायब होण्यावर आधारित आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने आयटी अॅक्ट कलम ६९ अ आणि आयटी नियम २०२१ अंतर्गत बंदी आदेश लागू केला आहे.
आयटी अॅक्ट कलम ६९ अ केंद्र सरकारला सार्वजनिक व्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचे सार्वभौमत्व याबाबत ज्यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित होतं त्यावेळी सरकार ऑनलाईन कंटेट ब्लॉक करू शकते किंवा हटवण्याचे आदेश देऊ शकते.
आयटी नियम २०२१ चा पार्ट ३ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजीटल न्यूज पब्लिशर्स यांना देखील या नियमाच्या कक्षेत घेऊन येतो. याअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालय आदेश देऊ शकते.
दिलजीत दोसांझ याचा हा चित्रपट दिवंगत मानवाधिकार हक्क कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यावेळी पंजाबमध्ये कट्टरतावाद सर्वोच्च पातळीवर होता त्यावेळी पोलीस फेक एन्काऊंटर करत होते. याचे सत्य बाहेर आणण्यासाठी जसवंत सिंह लढत होते. मात्र त्यांचे १९९५ मध्ये अपहरण होते. त्यानंतर त्यांचा काहीच पत्ता लागत नाही.
या चित्रपटाचे नाव यापूर्वी पंजाब ९५ असं होतं. हा चित्रपट २०२२ मध्ये पहिल्यांदा CBFC कडे गेला होता. त्यावेळी या चित्रपटात सीबीएफसीने २२ कट सुचवले होते. मात्र वर्षानुवर्षे त्यांचे बदल सुचवणे बदलत गेले. २०२५ मध्ये या बदलांची संख्या १२७ पर्यंत पोहचली. निर्मात्यांनी या चित्रपटात एवढे बदल करण्यास नकार दिला. त्यानंतर चित्रपट शुक्रवारी झी ५ वर ओटीटीवर रिलीज करण्यात आला. मात्र रविवारी तो काढून टाकण्यात आला.