

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन जिवलग मैत्रिणींमध्ये होणार आहे कडाक्याचे भांडण. काल यशश्रीने सदस्यांवर केलेला प्रॅन्क तिच्यावरच उलटला. प्रसाद तिच्यावर कमालीचा नाराज झाला. त्यांनतर अमृता धोंगडेने देखील प्रसादची खिल्ली उलडवली. ज्यामध्ये तिने तेजस्विनीला मध्ये आणले ज्यावरून अमृता धोंगडे आणि (बिग बॉस मराठी सिझन 4) प्रसादमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आणि या सगळ्यात प्रसाद बरोबर आहे असे कुठेतरी तेजस्विनीचे म्हणणे आहे. आज याच मुद्द्यावरून, झाल्या प्रकारावरून दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होणार आहे. (बिग बॉस मराठी सिझन 4)
तेजस्विनी अमृताला सांगताना दिसणार आहे, मला जे खरंच लागलं आहे त्याला तू प्रॅन्क बोललीस मी खरं भांडायला पाहिजे की मी वेड्यासारखं तुझ्याकडे प्रेमाने आले तर तू त्याला ओरडून सांगते काय संबंध? त्याला ओरडून सांगायची काय गरज? तो कुठल्या मूडमध्ये आहे, तो तिथे डिस्टर्ब आहे.
अमृता म्हणाली, अगं मी मस्करी करत होते. तुझ्यावरून नाही बोले मी. तेजस्विनी म्हणाली, मला त्याचं का valid वाटतं, तो झोनच वेगळा आहे त्या माणसाला बोलावून दुसऱ्या प्रॅन्कबद्दल का बोलायचा काही संबंधच नाहीये. अमृता धोंगडे म्हणाली, त्याने खूप विषय वाढवला. तेजस्विनी म्हणाली, एकाच बाजूने नव्हतं तू पण बोलत होतीस. अमृता म्हणाली, तो किती बोलला मला. हे शेवटचं बोललीस मला.. तेजस्विनीचे म्हणणे आहे, मुद्दा वाढवायची गरजचं नाहीये हा…
पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा.