आलिया भट्‍ट-रणबीर कपूरनं काय ठेवलं मुलीचं नाव? नीतू कपूर झाल्‍या भावूक | पुढारी

आलिया भट्‍ट-रणबीर कपूरनं काय ठेवलं मुलीचं नाव? नीतू कपूर झाल्‍या भावूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Alia Bhatt-Ranbir Kapoor Baby Name : बॉलिवूडचे स्‍टार कपल आलिया आणि रणबीर कपूरला नुकतंच कन्यारत्‍न झालं. आता हे स्‍टार कपल असल्‍याने त्‍यांच्या मुलांची चर्चा तर होणारच ना.. मग आता या मुलीच नाव काय ठेवणार याची चर्चा रंगू लागलीय. त्‍यात बर्‍याच लोकांना वाटतं की, सध्याच्या ट्रेंडला फॉलो करून मुलीचे नाव ठेवले जाईल. पण तस नाहीये. रणवीर-आलियाच्या मुलीच नाव खास असणार आहे. ते काय असणार तुम्‍ही विचार करू शकता?

आलिया आणि रणबीर सध्या आपल्‍या छोट्या मुलीचे लाड करण्यात गुंतले आहेत. मुलीच्या जन्माने आलिया आणि रणबीरच्या आनंदाला पारावारच उरलेला नाही. दोघांसाठी आणि कपूर घरण्यासाठीही हा आनंदाचा क्षण आहे. त्‍यातच आता या छोट्या परीचे नाव काय ठेवणार हे जाणून घेण्यासाठी आलिया आणि रणबीरचे चाहते उत्‍सुक झाले आहेत.

आलिया-रणबीरनं काय ठेवले मुलीचे नाव? 

तुम्‍हीही रणबीर-आलियाच्या मुलीचे नाव जाणून घेण्यासाठी उत्‍सुक असाला तर, तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. रणबीर-आलियाच्या मुलीचे नाव दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या नावाशी कनेक्‍टेड असेल. बॉलिवूडच्या वृत्‍तानुसार रणबीर-आलियाने ऋषी कपूर यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्‍या मुलीचे नाव ऋषी कपूर यांच्या नावाशी जोडलेले असावे असे ठरविले आहे.

रणबीर आणि आलियाच्या या निर्णयाने आलियाच्या सासुबाई आणि रणबीरची आई नीतू कपूर या भावूक झाल्‍या आहेत. आपल्‍या लाडक्‍या नातीच्या जन्मापासून खूश असलेल्‍या नीतू कपूर यांनी नातीला सर्वात क्‍यूट असल्‍याचं म्‍हटलं आहे. आपल्‍या लाडक्‍या नातीचे नाव जगाला सांगण्यासाठी आजीबाई आतूर झाल्‍याचं दिसून येत आहे.

कपूर कुटुंबीयांनी नावांची यादी काढली… 

कपूर कुटुंबियांनी नावाची यादी काढली असून, लवकरच छोटुल्‍या परीचे नाव जगजाहीर करण्यात येणार आहे. ते जाहीर करतील तेव्हा करतील तोपर्यंत चाहत्‍यांनी नावाचा तर्क लावायला हरकत नाही.

हेही वाचा : 

Back to top button