Shraddha murder case: श्रद्धा हत्या प्रकरणी पोलिसांना मिळाला पहिला पुरावा, प्लंबरने दिली महत्वाची माहिती | पुढारी

Shraddha murder case: श्रद्धा हत्या प्रकरणी पोलिसांना मिळाला पहिला पुरावा, प्लंबरने दिली महत्वाची माहिती

पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha murder case) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील छतरपूर पहाडी येथील प्लंबरने त्याने खूनी आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर या दोघांना फ्लॅटवर एकत्र पाहिले होते. हे दोघे लिव्ह इनमध्ये या फ्लॅटमध्ये रहात असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. प्लंबरने दिलेली माहिती हि श्रद्धा हत्याकांडातील महत्वाचा पुरावा मानला जात आहे.

गुरूवारी दिल्ली पोलिसांनी या केसप्रकरणी शोधमोहीम (Shraddha murder case) सुरू ठेवत, आणखी एक नवीन पुरावा शोधून काढला आहे. मृत श्रद्धा आणि खूनी आफताब यांचे रक्ताने माखलेले कपडे ज्या कचरा गाडीत फेकलेले, त्या कचरा गाडीची ओळख पोलिसांना पटली असून, पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या दोघांना एकत्र पाहिलेल्या प्लंबरने पोलिसांना जबाब देताना सांगितले की, ते उन्हाळ्यात फ्लॅटवर रहायला आले होते, तेव्हा हे दोघेही आनंदी दिसत होते. ते दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बसले असल्याचे मी पाहिले आहे. यानंतर आणखी एका प्रसंगी आफताब यांच्याही बोलने झाल्याचे या प्लंबरने सांगितले आहे. तो म्हणाला, दुसऱ्या मजल्यावर असलेल्या भाडेकरूंची पाणी समस्या पाहण्यासाठी मला घरमालकाने फोन करून सांगितले. त्यावेळी मी या कुटुंबाला पाण्याची टाकी कशी भरायची ते सांगितले. याचवेळी आफताब त्या ठिकाणी आला आणि त्याने मला त्याच्या पाण्याच्या कनेक्शनसाठी मोटर पंप कसा चालू करायचा विचारले होते. त्यानंतर याच बिल्डिंगमधील मी अनेकांची प्लंबिंगची कामे केली पण पुन्हा कधी भेट किंवा आफताबचा (Shraddha murder case) मला कॉल आला नसल्याचे या प्लंबरने सांगितले.

Shraddha murder case: बिल्डिंगमधील अनेकांनी उघडले तोंड

दिल्लीतील ज्या बिल्डिंगमध्ये हे जोडपे रहात होते, या ठिकाणी त्यांना प्लंबर व्यतिरिक्त इमारतीतील बहुतेक रहिवाशांनी श्रद्धा हिला पाहिले नसल्याचा दावा केला आहे. याच बिल्डिंगमधील आणखी एका रहिवाश्याने सांगितले की, “मी फक्त आफताबला पाहिले, जो डिलिव्हरी बॉईजकडून पॅकेट घेण्यासाठी खाली यायचा.” एका दुकानदाराने फक्त पूनावाला सिगारेट विकत घेण्यासाठी त्याच्या दुकानात दोन-तीन वेळा आल्याचे देखील सांगितले आहे. हे दोघे राहत असलेल्या बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरील शेजाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या मजल्यावरून कधीही आवाज आला नाही. येथील एका एका महिलेने देखील “माकडाच्या त्रासामुळे आम्ही आमचे दरवाजे बंद ठेवतो. मी फक्त काही वेळा आफताबला टेरेसवर जाताना पाहिले असल्याचे सांगितले आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडातही पोलिस करणार तपास

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दाम्पत्याच्या घरमालकाचीही चौकशी केली आणि त्याच्याकडून काही कागदपत्रे घेतली आहेत. तपास अधिकारी आरोपीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये घेऊन जाण्याची शक्यता आहे, कारण यापूर्वी ते दोघे तिथे गेले होते. पोलिसांनी शोधून काढलेल्या माहितीनुसार हे जोडपे पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबले असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

 

 

Back to top button