नवी दिल्ली : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळविली. या चित्रपटाने हिंदी भाषिक भागातही कमाईचे नवे विक्रम स्थापन केले. पुष्पाला मिळालेल्या यशामुळे आता या चित्रपटाच्या दुसर्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.'पुष्पा-2' (Pushpa 2) मध्येही अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच असतील. मात्र, आता असाही दावा केला जात आहे की, दिग्दर्शन सुकुमार यांनी 'पुष्पा-2' चे चित्रीकरण थांबवले आहे.
केजीएफ चाप्टर-2 च्या उत्तुंग यशानंतर 'पुष्पा-2' चे चित्रीकरण थांबवले गेल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात फिल्म मेकर्सची नुकतीच प्रतिक्रिया आली आहे. 'पुष्पा-2' (Pushpa 2) चे निर्माते रवी शंकर यांनी सांगितले की, माझ्याजवळ पहिल्यापासून अत्यंत चांगली स्क्रिप्ट आहे. यात बदलण्याची गरजच नाही. 'पुष्पा-2' ला प्रभावित करण्यासाठी 'केजीएफ-2' ने असे काय केले आहे. आमच्याजवळ पूर्वीपासूनच हायव्होल्टेज स्क्रिप्ट असून त्यात बदल करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
याआधी एक बातमी आली होती की 'केजीएफ २' नंतर 'पुष्पा २' चे निर्माते-दिग्दर्शक सिनेमातील अॅक्शन सीन्स आधीच्या भागातील सीन्सपेक्षा अधिक मोठ्या स्वरुपात दाखवणार आहेत. 'पुष्पा २' सिनेमा १६ डिसेंबरला रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा पहिला भाग १७ डिसेंबर रोजी सिनेमागृहात भेटीस आला होता.
'पुष्पा' चित्रपट हा एक प्रादेशिक आहे हा चित्रपट संपूर्ण भारतात या चित्रपटाचा गाजावाजा होईल असे चित्रपटाच्या निर्मात्यांलाही वाटले नव्हते. या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल केल्यानंतर ते तेलुगूशिवाय इतर प्रेक्षकांना प्रभावित करतील, असा त्यांचा अंदाज आहे. चित्रपटाचं मुख्य पात्र पुष्पराज हा चंदनाची तस्करी करणार्या सिंडिकेटवर आपली कशी हुकूमत गाजवतो हे चित्रपटाच्या पुढच्या भागात दाखवले आहे.