Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती रूग्णालयात, प्रकृतीविषयी मुलाने दिली माहिती | पुढारी

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती रूग्णालयात, प्रकृतीविषयी मुलाने दिली माहिती

पुढारी ऑनलाईन : अभिनेता धर्मेंद्रनंतर बॉलिवूडचा डिस्को डान्सर आणि अभिनेता मिथुन चक्रवर्तींना (Mithun Chakraborty) बंगळुरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने दिली आहे.

मिमोह चक्रवर्ती याने सांगितले की, मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना बंगळुरु येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर किडनीस्टोनची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याची प्रकृती ठीक असून त्यात सुधारणा होत आहेत. लवकरच ते बरे होवून घरी परत येतील.

नुकतेच भाजपचे माजी खासदार डॉ. अनुपम हाजरा यांनी मिथुन चक्रवर्ती यांचा हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘मिथुन दा यांना लवकरात- लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. गेट वेल सून मिथुन दा’. असे म्हटलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे ज्‍येष्‍ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल केले होते. यानंतर नुकतेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तींना प्रकृतीबाबत वृत्त समोर आले आहे.  मिथुन चक्रवर्ती लवकर बरे व्‍हावेत, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button