prarthana behere : मराठीची राणी मुखर्जी ! प्रार्थना बेहरेच्या लूकवर चाहते फिदा (video)

prarthana behere : मराठीची राणी मुखर्जी ! प्रार्थना बेहरेच्या लूकवर चाहते फिदा (video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : माझी तुझी रेशीमगाठ फेम आणि मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (prarthana behere ) सध्या चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत तिने नेहाची भूमिका साकारत चाहत्यांना भूरळ घातली आहे. तर प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हटके फोटो आणि मराठमोळा लूकमधील फोटो शेअर करत असते. सध्या तिच्या हिरव्या रंगाच्या पैठणीने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ( prarthana behere ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या पैठणीतील काही फोटो आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. यावेळी साडीचा हिरवा रंग, साजेशीर दागिने, मोकळ्या केसासह मेकअपने तिच्या सौदर्यांत आणखी भर घातली आहे. या फोटोंना पोझ देताना तिने आपल्या गालावर हात ठेवला आहे.

या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने '❤️राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हांविण बाई, कोणता करू शिणगार सांगा तरी काही ❤️'. असे लिहिले आहे. तर तिने यावेळी साडीच्या प्रेमात असल्याचे म्हटले आहे. हा फोटो आणि व्हिडिओ चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत. यातील खास म्हणजे, प्रार्थनावर हिरवा रंग खूपच सुंदर दिसत आहे. तर वाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरल्या आहेत.

हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'झुल्फे मत बाँधा करो, अपनी हवाएं नाराज़ हो जाती है..❤️❤️❤️❤️', 'खूपच सुंदर दिसतेस ????❤️❤️', 'लय भारी ????', 'मराठीची राणी मुखर्जी ❤️❤️',. तर दुसऱ्या एका युजर्सने 'किती हे सौंदर्य?', 'सुंदर..???', 'क्यूट', 'खूप आवडलीस तू आणि साडी❤️?', 'कडक', 'अतिशय सुंदर?', 'मराठी सुंदरता', 'अप्रतिम सुंदर'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर आणखी काही युजर्संनी' Wooooooh??', 'Heyyy Beauty Queen❤️❤️❤️ Looking soo Georgeous ??????', 'Very nice ❤️❤️❤️❤️????'अशीही प्रतिक्रिया फोटोवर मिळत आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे भरपूर ईमोजी शेअर केले आहेत.

प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ मराठी मालिका आणि पवित्र रिश्ता हिंदी मालिकेत दिसली. तर ती 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' यांसारखे हिट चित्रपट दिसली. याशिवाय ती सोशल मीडियावर सक्रिय असून आपले फोटोज शेअर करत असते. तिच्या इंन्स्टाग्रामवर २० लाखांहून अधिक फालोवर्स आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news