Sai Pallavi : ‘प्रेमम’ फेम साऊथ स्टार साई पल्लवी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार ! | पुढारी

Sai Pallavi : 'प्रेमम' फेम साऊथ स्टार साई पल्लवी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार !

पुढारी ऑनलाईन : साऊथ अभिनेत्री साई पल्लवी ही तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने अल्पावधीतच मारी 2, प्रेमम आणि लव्हस्टोरी सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देऊन साऊथ इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. तामिळ चित्रपट साई पल्लवी लवकरच स्टार राणा डग्गुबती  यांच्या ‘ वीरता पर्वम ‘ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या ही अभिनेत्री  तिच्या चित्रपट कारकिर्दीच्या अतिशय सुंदर टप्प्यावर आहे.  तिची लोकप्रियता देखील सातत्याने वाढत आहे. दरम्यान, या अभिनेत्रीबाबत एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांचे मन तुटू शकते. कारण ती लवकरच नववधू बनणार असल्याचे समजते.

साई पल्लवी लग्नाच्या तयारीत

अभिनेत्री साई पल्लवी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे ऐकण्यात येत आहे. समोर येत असलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री साई पल्लवीच्या लग्नासाठी तिचे पालक तयारीला लागले आहेत. त्यामुळे तिच्या पालकांनी परफेक्ट वराचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. तिचा आगामी चित्रपट “वीरता पर्वम ” प्रदर्शित झाल्यानंतरच तिचे हात पिवळे होणार असल्याचा दावा केला जात आहे. हे केवळ वृत्त असून, यावर अद्याप अभिनेत्री साई पल्लवीच्या वक्तव्याची वाट चाहते बघत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai)

मेडिकलची विद्यार्थिनी आहे ” साई पल्लवी “

अभिनेत्री साई पल्लवी ही मेडिकलची विद्यार्थिनी आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ती साऊथ फिल्मी इंडस्ट्रीत आली आहे. जिथे या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून स्वत:ला आणि स्वत:च्या क्षमतेला सिद्ध केले आहे. साई तिच्या साधा लुक आणि दमदार अभिनयामुळे लोकांच्या मनावर राज्य करत आहे. या अभिनेत्रीचा स्टार नागा चैतन्यबरोबरचा रिलीज झालेला चित्रपट हि एक ‘ लव्ह स्टोरी ‘ होती, जो खूपच सुपरहिट ठरला होता. अशा परिस्थितीतच या अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी तिच्या चाहत्यांना धक्का देऊन गेली आहे. तसेच तिच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता देखील आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button