पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पठान'चा वाद वाढतचं चाला आहे. प्रत्येक दिवशी काही न काही नवे अपडेट समोर येत असतात. (Pathaan Controversy) मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दीपिका पादुकोणच्या बिकिनी रंगावरून टीका केल्यानंतर आता आणखी एका मंत्र्याने यावर निशाणा साधलाय. बिहारमध्ये भाजप मंत्री हरि भूषण ठाकुर बलोच यांनी पठान बिहारमध्ये रिलीज होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. (Pathaan Controversy)
बलौच यांचं म्हणणं आहे की, 'या चित्रपटाच्या निर्मात्यांनी देशाची सनातन संस्कृती कमकुवत करण्याचा घाणेरडा प्रयत्न केला आहे. भगवा रंग सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले, 'सूर्याचा रंग भगवा आहे आणि अग्निचाही रंग भगवा आहे. हा बलिदानाचा रंग आहे. चित्रपट निर्मात्यांनी भगव्या रंगाला बेशर्म म्हटलं आहे. हे खूपचं वाईट कृत्य आहे. अभिनेत्रीचा शॉर्ट ड्रेस अश्लीलता दर्शवते. हेच कारण आहे की देशात सर्वाधिक लोक चित्रपटाच्या बहिष्काराची मागणी करत आहेत.
हरिभूषण ठाकुरने म्हटलं की, आम्ही हा चित्रपट बिहारमध्ये रिलीज होऊ देणार नाही. ते पुढे म्हणाले की, कार्यकर्ते चित्रपटगृहांबाहेर या चित्रपटाचा विरोध करत आहेत.
दरम्यान, स्वरा भास्कर, रत्ना पाठक, रश्मी देसाई, चित्रपट दिग्दर्शक ओनिर, मुकेश खन्नासह अनेक सेलिब्रिटींनी यावर मत व्यक्त केलं आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये या चित्रपटावरून खूप मोठा गोंधळ निर्माण झालाय.