Milind Soman : ‘बेशर्म रंग’वरून मिलिंदला आठवली न्यूड फोटोशूटची कायदेशीर लढाई

milind soman
milind soman
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर चित्रपट 'पठाण'चा वाद थांबायला तयार नाही. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे जेव्हापासून रिलीज झाले आहे, तेव्हापासून हा वाद वाढत चालला आहे. या गाण्यावर अश्लिलता पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. (Milind Soman) अनेक स्टार्स या गाण्याच्या समर्थनार्थ आले. आता अभिनेता मिलिंद सोमनने बेशर्म रंग गाण्यावर चाललेल्या विवादावर आपल्या जुन्या वादग्रत न्यूड फोटोशूटवर झालेल्या वादावर आपले मत मांडले आहे. (Milind Soman)

आपल्या फिटनेसने सर्वांना प्रेरणा देणारा अभिनेता मिलिंद सोमन प्रसामाध्यमांशी बोलला. यावेळी बोलताना त्याने त्याच्या तथाकथित न्यूड फोटोशूटविषयी सांगितले. त्याला कशाप्रकरारे १४ वर्षे कायदेशीर लढाई लढावी लागली, याविषयी त्याने सांगितले. मिलिंद म्हणाला, प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य हवे. सर्वांना आपले अधिकार आहेत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार हवा. जर यावर कुणी आक्षेप घेतला तर यावर कायदा आपला निर्णय घेईल.

मिलिंद सोमनने मधू सप्रेसोबत न्यूड फोटोशूट केला होता. तसेच या न्यूड फोटोशूटमध्ये दोगांच्या पायात केवळ शूज होते. जेव्हा या जाहिरातवर वाद वाढला तेव्हा लाईफ प्रोटेक्शन अंतर्गत कोर्टात केसदेखील दाखल झाली. तो १४ वर्षे कायदेशीर लढाईत अडकून राहिला. २००९ मध्ये याप्रकरणी त्याला निर्दोष ठरवण्यात आले.

सध्या पठाण चित्रपटातील गाणं बेशर्म रंग रिलीज झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. समाजात अश्लिलता पसरवणे आणि दीपिकाने परिधान केलेल्या भगवा रंगाच्या बिकिनीवरून लोक खूप टीका करत आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये रििलीज होत आहे. या चित्रपटातून शाहरुख खान मोठ्या पडद्यावर वापसी करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news