Mirzapur Season 3
Mirzapur Season 3

‘मिर्जापूर सीजन 3’ ट्रेलरची प्रतीक्षा संपली! पंकज त्रिपाठी कोणता धमाका करणार?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंकज त्रिपाठीची सीरीज 'मिर्जापूर'च्या तिसऱ्या सीझनच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. एका पोस्टरसोबत रिलीज डेट समोर आली आहे. मिर्जापूर सीजन ३ जुलैमध्ये रिलीज होणार आहे. याआधी क्राईम थ्रिलर सीरीजच्या ट्रेलरची प्रतीक्षा होत आहे. आता मिर्जापूर सीझन ३ ची ट्रेलर ऑफिशियल रिलीज डेट समोर आलीय.

अधिक वाचा-

प्रतीक्षेत राहा, यादिवशी मिर्जापूर ३ ट्रेलर भेटीला

प्राईम व्हिडिओने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिर्जापूर सीजन ३ ट्रेलरचे ऑफिशियल तारखेची घोषणा केलीय. निर्मात्यांनी मिर्जापूर ३ मधून मल्टीस्टार पोस्टर देखील शेअर केले आहे. त्यांनी लिहिलंय- छल कपट, शह-मात, मिलेगी एक झलक इस गद्दी के खेल की.
मिर्जापूर सीजन ३ ट्रेलर २० जूनला रिलीज होईल. कॅप्शनमधून मिर्जापूर ३ च्या ट्रेलरमधून मोठा शॉकिंग खुलासा होईल, असे वाटत आहे.

अधिक वाचा-

कधी रिलीज होणार मिर्जापूर सीजन ३?

याआधी ११ जून रोजी मिर्जापूर सीजन ३ च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली होती. मिर्जापूर सीजन ३ च्या रिलीज डेट च्या घोषणेनंतर सीरीज ५ जुलैला ॲमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होईल.

अधिक वाचा-

हे आहेत मिर्जापूर ३ चे कलाकार

पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर आणि विजय वर्मा असे कलाकार मिर्जापूर ३ मध्ये आङेत. काही नवे कलाकार देखील यामद्ये पाहायला मिळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news