गायिका अलका याज्ञिक यांच्या श्रवण यंत्रावर व्हायरल ॲटॅक, ऐकू येणे झाले बंद

अलका याज्ञिक
अलका याज्ञिक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हियरिंग डिसऑर्डर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना अचानक ऐकू येण्याचे बंद झाले. त्यांनी डॉक्टरांकडे दाखवल्यानंतर त्यांना हा दुर्मिळ डिसऑर्डर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अलका याज्ञिक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, फ्लाईटमधून बाहेर आल्यानंतर त्यांना जाणवलं की, त्यांना ऐकू येत नाहीये. त्या म्हणाल्या, डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ते एक ल्हायरल ॲटॅकमुळे रेयर सेन्सरी नर्व हियरिंग लॉस झाले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मी धक्क्यात आहे आणि ही गोष्ट स्वीकार करण्याचा प्रयत्न करत आहे.

अधिक वाचा –

त्यांनी आपल्या फॅन्सकडे प्रार्थना करण्याची मागणी देखील केली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक मोठ्या स्टार्सनी त्यांना हिम्मत आणि धैर्य ठेवण्यास सांगितले आहे.

अधिक वाचा –

सोनू निगम, इला अरुण यांनी केली प्रार्थना

अलका यांच्याबद्दलचे वृत्त ऐकून गायक सोनू निगम यांनी एक्स अकाऊंटवर ट्विट केले आहे- मला वाटत होतं की, काहीतरी चागलं नाहीये. मी परत आल्यानंतर भेटेन. परमेश्वर आपणास लवकर बरे करो. इला अरुण यांनी लिहिलं की-ऐकून खूप वाईट वाटलं. हे हार्ट ब्रेकिंग आहे. चांगल्या डॉक्टर्सकडून उपचार घेऊन तुम्ही लवकर बरे व्हाल आणि आम्ही लवकरच आला गोड आवाज ऐकू शकू. पूनम ढिल्लन यांनी लिहिलं- तुम्हाला खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद. तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुम्ही लवकरच हेल्दी व्हाल. फॅन्सदेखील त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अधिक वाचा –

२१ हजारांहून अधिक गाणी अलका यांनी गायलेली आहेत. यामध्ये ये बंधन तो, हमने तुमको दिल ये दे दिया, उडजा काले कावां यासारखी गाण्यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news