

मुंबई : बॉलिवूडमध्ये ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट आणण्याासठी स्पर्धा सुरु असताना भोजपुरी इंडस्ट्रीत एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. सुपरस्टार पवन सिंह ऑपरेशन सिंदूर हे गाणे घेऊन आला आहे. हे गाणे रिलीज होताच यू-ट्यूबवर ट्रेंड करत आहे. यामध्ये पहलगाम ॲटॅक ते भारतीय लष्कराचे ऑपरेशन पर्यंतची झलक पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हे गाणे ट्रेंड करत आहे. भोजपुरी गायकाचा आवाज आणि सीन्समुळे हा भावूक करणारा व्हिडिओ ठरला आहे.
ऑपरेशन सिंदूर पवन सिंहने आपला सुंदर आवाज दिला असून हे गाणे किशोर दुलारुआने लिहिलंय आणि कम्पोज केलं आहे. शानदार म्युझिकल गौतम यादवने तयार केलं आहे. बर्दर म्युझिक स्टुडिओच्या यु-ट्यूब चॅनलवर हे रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणे नंबर-२ वर ट्रेंड करत आहे. पवन सिंहचे हे नवे गाणे ‘ऑपरेशन सिंदूर’ भारतीय लष्कराच्या साहसाला समर्पित आहे. खरंतर, २२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्ल्यानंतर सेनाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले होते.
पवन सिंहच्या या नव्या गाण्याची सुरुवात काश्मीरच्या सुंदर निसर्गाने होते. एक व्यक्ती दुर्बिणीने तिथे पिकनिकला आलेल्या फॅमिलीला पाहतो. नंतर तो ग्रुपमध्ये येतो आणि निष्पाप लोकांना मारतो. आजूबाजूच्या महिला आरडाओरड करतात. मग पवन सिंहचा शॉर्ट येतो, ज्यामध्ये पीएम मोदी भाषण देतात आणि महणतात की, दहशतवाद्यांना सोडणार नाही. त्यानंतर भारतीय सेना ऑपरेशन सिंदूर राबवतात.