Pawandeep Rajan | Indian Idol विजेता पवनदीप राजनचा अपघातानंतर पहिला सुरेल व्हिडिओ व्हायरल

पवनदीपचा रुग्णालयातून एक चांगला व्हिडिओ आणि पोटो समोर आला आहे. जे पाहून त्याच्या फॅन्सना मोठा दिलासा मिळाला आहे.
image of singer Pawandeep Rajan
Pawandeep Rajan recovery health updates Instagram
Published on
Updated on

Indian Idol 12 Winner Pawandeep Rajan sing a song video viral

मुंबई : Indian Idol 12 विजेता पवनदीप राजनचा अपघातानंतर रुग्णालयातून सुरेल व्हिडिओ व्हायरल होत आहे. इन्स्टा स्टोरीवर एक फोटो देखील आहे, ज्यामध्ये तो बुद्धिबळ खेळताना दिसतो. यानंतर फॅन्स तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत.

व्हिडिओ पाहून फॅन्सना दिलासा

एका कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या पवनदीपला गाताना पाहून फॅन्सना दिलासा मिळाला आहे. त्याची टीम हेल्थ अपडेट्स शेअर करत आहे. दुसरीकडे, पवनदीपने स्वत: इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. ज्यामध्ये तो रुग्णालयाच्या स्टाफ सोबत बुद्धिबळ खेळताना दिसत आहे. त्याने लिहिलं– “रिकव्हरी मोड ऑन, आपल्या आशीर्वादासाठी धन्यवाद.”

image of singer Pawandeep Rajan
Aamir Khan Mahabharat : आमिर खान 'कृष्‍ण', तर १८०० कोटींचा अभिनेता साकारणार 'अर्जुन'! या चर्चेने चाहत्‍यांची उत्‍कंठा शिगेला

video- necropolis_028 insta वरुन साभार

पवनदीपचा गाताना व्हिडिओ व्हायरल

याशिवाय, पवनदीपचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो रुग्णालयात बेडवर बसून गाणे गाताना दिसत आहे. सुरांचा गोडवा पाहून पवनदीपच्या फॅन्सचा जीव भांड्यात पडला आहे. एका युजरने म्हटलं की ‘लवकर ठिक हो भाऊ.’ दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘तुम्ही खूप स्ट्राँग आहात सर, गेट वेल सून.’

image of singer Pawandeep Rajan
Vaama Ladhai Sanmanachi Title Song | ‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील टायटल साँग प्रदर्शित, कैलास खेर यांचा सुरेल आवाज
Admin

भीषण अपघातात गंभीर जखमी झाला होता पवनदीप

भीषण कार दुर्घटनेत पवनदीप गंभीर जखमी झाला होता. हा अपघात ५ मे, २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जवळ झाला. त्याची कार रस्त्यावर उभारलेल्या एका कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात पवनदीप गंभीर जखमी झाला होता. सोबतच कारचा देखील चक्काचूर झाला होता. पण अनेक शस्त्रक्रियेनंतर पवनदीपच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news