Shiny Doshi | वडीलच मला वेश्या बोलायचे; छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने शेअर केला अंगावर काटा आणणारा अनुभव

TV Actress Shiny Doshi | वडील Prostitute म्हणायचे; आईला खूप मारायचे...अभिनेत्री शाईनी दोशीने धक्केदायक खुलासे केले आहेत
image of Shiny Doshi and her mother
TV Actress Shiny Doshi reveal relationship with father Instagram
Published on
Updated on

TV Actress Shiny Doshi reveal about relationship with father

मुंबई - टीव्ही अभिनेत्री शायनी दोशीने आपल्या वडिलांसोबत असलेल्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. एका मुलाखतीत तिने सांगितले की, वडिलांसोबतचं नाचं ठिक नव्हतं. ते आईलादेखील खूप मारायचे. ते कधीच साईनीसोबत चांगले बोलले नाही. परिणामी, ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

घरातील वातावरणाचा मुलांवर परिणाम होत असतो. आई-वडिलांचे वागणे, त्यांचा मुलासोबतचा व्यवहार कसा आहे, या सर्व गोष्टींचा परिणाम पाल्यांवर होत असतो. जर मुलांना चांगली वागणूक नाही मिळाली, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत आणि मुलांना बालपणीच जर घरगुती हिंसाचार पाहायला मिळत असेल तर त्यांच्या मानसिक आणि भावनात्‍मक आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

image of Shiny Doshi and her mother
Pawandeep Rajan | Indian Idol विजेता पवनदीप राजनचा अपघातानंतर पहिला सुरेल व्हिडिओ व्हायरल

असेच काही टीव्ही अभिनेत्री शाइनी दोशी सोबत झाल. एका मुलाखतीत शाइनीने आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा त्या आठवणी कमी नाहीत, असे तिच म्हणणे आहे.

image of Shiny Doshi and her mother
Aamir Khan Mahabharat : आमिर खान 'कृष्‍ण', तर १८०० कोटींचा अभिनेता साकारणार 'अर्जुन'! या चर्चेने चाहत्‍यांची उत्‍कंठा शिगेला

शाइनी दोशीवर घरगुती हिंसाचाराचा वाईट परिणाम

शाइनीने सांगितलं की, वडील आईला खूप मारायचे आणि भांडणावेळी आईला खूप वाईट बोलायचे. तिचे आणि वडिलांचे नाते कटू होते आणि ती कधीच आपल्या वडिलांसोबत एक चांगले नाते बनवू शकली नाही.

शाईनीचा धक्कादायक खुलासा- वेश्या बोलायचे वडील

शाइनी जेवहा १६ वर्षांची होती, तेव्हा वडिलांनी तिला प्रॉस्टिट्यूट (वेश्या) म्हटलं होतं. त्यांनी आई, मला आणि भावाला सोडून घरातून निघून गेले होते. त्यानंतर घराची जबाबदारी तिच्यावर आली. एक वेळ अशी आली की, तिच्याकडे शाळेची फी आणि कॉलेजची फी भरायलाही पैसे नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news