Neetu Kapoor : आलिया- रणबीरच्या लग्नाआधी नीतू कपूरच्या साखरपुढ्याचा फोटो व्हायरल

Neetu Kapoor : आलिया- रणबीरच्या लग्नाआधी नीतू कपूरच्या साखरपुढ्याचा फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क: सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची तारिख आठवडाभर पुढे ढकलण्यात आल्याचे आलियाचा भाऊ राहुल भट्ट यांने नुकतेच घोषित केले होते. याच दरम्यान रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांनी (Neetu Kapoor ) भावूक होत आपल्या साखरपुढ्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो खूपच व्हायरल होत आहे.

अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor ) पती ऋषी कपूरच्या आठवणींने भावूक झाल्या आहेत. आजच्या दिवशी म्हणजे, ४३ वर्षापुर्वी १३ एप्रिल १९७९ रोजी नीतू कपूरचा ऋषी कपूर याच्याशी विवाहबद्ध झाल्या होत्या. या विवाहातील साखरपुड्याचा थ्रोबॅक फोटो नीतूने आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ऋषी कपूर नीतू याच्या हातात एंगेजमेंटची रिंग (अंगठी ) घालताना दिसत आहे. नीतू यांनी शेअर केलेला फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये नीतू यांनी "४३ वर्षांपूर्वीच्या बैसाखीच्या दिवसाच्या आठवणी, १३ एप्रिल १९७९ रोजी आमचा साखरपुडा झालाय❤️❤️❤️❤️❤️." असे लिहिले आहे. यावरून नीतू आणि ऋषी कपूर यांचे लग्न आजच्या दिवशी झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळेच त्यांना ऋषींची आठवण येत आहे. आज ऋषी कपूर आपल्यात नाहीत. परंतु, नीतू कपूर आजही त्याच्यासोबतच्या आठवणीने भावूक झाल्या आहेत.

या फोटोंवर नीतू आणि ऋषी कपूर यांच्या सेलिब्रिटींसह चाहत्यांनी भरभरून कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. यात ऋषी आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर, अभिनेता करण कुंद्राने हार्ट आणि फायरचा इमोजी शेअर केले आहेत. यात एका नेटकऱ्याने '*???? really the show men words…….the show must go on…time ….#time.' दुसऱ्या एका नेटकऱ्याने 'Thank you for sharing this lovely memory. ❤️❤️' असे म्हटले आहे. तर आणखी काही नेटकऱ्यानी 'Couple goals forever', 'Waheguru maher karey apki family pe ❤️?', 'o sweet memories ❤️❤️❤️ but really miss you chintu'. असे म्हटले आहे. याशिवाय काही युजर्सनी देखील हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत.

नीतू कपूर सध्या 'डान्स दिवाने ज्युनियर्स' या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहेत. नीतूने या शोच्या दरम्यान सांगितले की, या शोचा अनुभव खूप चांगला आहे. विशेष म्हणजे, २०२० साली पती ऋषी कपूर आम्हाला सोडून निघून गेले. यानंतर मी एकटी पडले होते. या शोच्या माध्यमातून पुन्हा जीवनाचा प्रवास सुरू केला आहे. माझ्या मनातील जुन्या गोष्टीची आठवण काढून टाकण्यासाठी आणि माझा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी मी कामात स्वत:ला बिझी ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news