Nana Patekar Gym Video: वय फक्त एक आकडा... गळ्यात गमछा, बंडी अन् बर्मुडा घातलेल्या ७६ वर्षाच्या नानांनी सगळ्यांनाच लाजवलं

Nana Patekar Gym Video
Nana Patekar Gym Videopudhari
Published on
Updated on

Nana Patekar Gym Video: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या जबरदस्त फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही नाना पाटेकर ज्या उर्जेने व्यायाम करत आहेत, ते पाहून तरुण पिढीलाही प्रेरणा मिळत आहे. नुकताच त्यांचा एक वर्कआउट व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये ते ७६ व्या वर्षीही अत्यंत सहजतेने व्यायाम करताना दिसत आहेत.

Nana Patekar Gym Video
Patralekha Body Shaming |बॉडी शेमिंगवरून टीका करणाऱ्या पापराझींना पत्रलेखाने सुनावले, म्हणाली...''मी दिवसभर बसून फक्त..''

अतुल कस्बेकर यांनी शेअर केला व्हिडिओ

प्रसिद्ध फोटोग्राफर आणि निर्माता अतुल कस्बेकर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नानांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर 'ट्रायसेप डिप्स' (Tricep Dips) मारताना दिसत आहेत. टॅन रंगाची शॉर्ट्स, पांढरी बनियान आणि गळ्यात नेहमीप्रमाणे गमछा अशा साध्या वेशात नाना बार्सवर व्यायाम करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी सलग १५ डिप्स मारले आणि व्यायाम संपल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता. अतुल कस्बेकर यांनी कॅप्शनमध्ये नानांचे कौतुक करत म्हटले की, "नाना साहेब, तुम्ही तर माझे फिटनेस गोल्सच बदलून टाकले आहेत! काय गजब लेजेंड आहेत!"

Nana Patekar Gym Video
Weight Loss Hack: डाएट कोक अन् च्युईंगम... वजन कमी करण्याचे हे कसले भन्नाट हॅक?

चित्रपट आणि आगामी प्रोजेक्ट्स

नाना पाटेकर आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय असून नवनवीन भूमिका साकारत आहेत. ते शेवटचे 'हाऊसफुल ५' या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख यांच्यासोबत दिसले होते. याशिवाय 'ओ रोमियो' चित्रपटात त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून 'सूबेदार' चित्रपटात त्यांचा कॅमिओ पाहायला मिळाला आहे. 'संकल्प' या वेब सीरिजमधील त्यांच्या कामाचेही कौतुक झाले आहे. अभिनयासोबतच नानांचा हा फिटनेस पाहून त्यांचे चाहते आता त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news