Weight Loss Hack: डाएट कोक अन् च्युईंगम... वजन कमी करण्याचे हे कसले भन्नाट हॅक?

Anirudha Sankpal

कुवर कपूर या तरुणाने काही वेगळ्या आणि अनोख्या फिटनेस हॅक्सच्या मदतीने ६० किलो वजन कमी केले आहे.

डाएट सोडा

जेवणासोबत झिरो कॅलरी असलेला डाएट सोडा प्यायल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते.

शुगर-फ्री गम

जेवणानंतर शुगर-फ्री गम चघळल्याने मेंदूला अजूनही खात असल्याचा भास होतो, ज्यामुळे मिठाई किंवा स्नॅक्स खाण्याची इच्छा कमी होते.

प्रोटीनला प्राधान्य

ताटात सर्वात आधी प्रोटीन, त्यानंतर कर्बोदके आणि शेवटी पालेभाज्या वाढून घेतल्याने अन्नाचे योग्य नियोजन होते.

टी मॅक्सिंग (Fidgeting)

फोनवर बोलताना चालणे किंवा बसल्या जागी पाय हलवणे यासारख्या छोट्या हालचालींमधून नकळत अतिरिक्त कॅलरी जळतात.

उभे राहून काम

लॅपटॉप किंवा मोबाईल वापरताना अर्धा वेळ उभे राहून काम केल्याने बसण्याच्या तुलनेत शरीर अधिक ऊर्जा वापरते.

३-२-१ नियम

झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण, २ तास आधी पाणी आणि १ तास आधी स्क्रीन बंद ठेवल्याने पचन सुधारते आणि वजन वेगाने कमी होते.

पचन वॉक

प्रत्येक जेवणानंतर केवळ ५ मिनिटे वेगाने चालल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि कर्बोदके चरबीऐवजी स्नायूंमध्ये साठवली जातात.

हे अनुभव सोशल मीडियावरील माहितीवर आधारित आहेत; कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

येथे क्लिक करा