Patralekha Body Shaming |बॉडी शेमिंगवरून टीका करणाऱ्या पापराझींना पत्रलेखाने सुनावले, म्हणाली...''मी दिवसभर बसून फक्त..''

Patralekha Body Shaming | बॉडी शेमिंग करणाऱ्यांवर पत्रलेखा भडकली, म्हणाली - "मी दिवसभर बसून फक्त..."
Patralekha
Patralekha Body Shaming instagram
Published on
Updated on
Summary

अभिनेत्री पत्रलेखा हिला अनेकदा तिच्या एअरपोर्ट लूक किंवा जिम लूकवरून सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. नुकतेच काही पापराझी आणि युझर्सनी तिच्या वाढलेल्या वजनावरून किंवा शरीरावरून कमेंट्स केल्या होत्या. यावर गप्प न बसता पत्रलेखाने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांना अनेकदा त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या दिसण्यावरून (Looks) जास्त पारखले जाते. सध्या अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha) अशाच एका परिस्थितीचा सामना करत असून तिने टीका करणाऱ्यांना अत्यंत कडक शब्दांत उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर पत्रलेखाचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर काही लोकांनी तिच्या शरीरावरून (Body Shaming) आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या, ज्यावर आता अभिनेत्रीने मौन सोडले आहे.

Patralekha
Bhooth Bangla BO Collection |अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीचा मोठा धमाका; 'भूतबंगला'ची पहिल्याच दिवशी 'भूलभुलैया २'ला धोबीपछाड?

पत्रलेखाने बॉडी-शेमिंग करणाऱ्या पापाराझींवर टीका केली. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर, पत्रलेखाने प्रसूतीनंतर झालेला बदल आणि तिच्या शरीरावरून टीका करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. तिने स्पष्ट केले की, तिच्या शरीरातील बदल हे प्रसूतीनंतरच्या टप्प्याचा एक नैसर्गिक भाग आहेत आणि तिने लोकांना अधिक सहानुभूती दाखवण्याचे आवाहन केले.

"माझ्यासोबत काय झालंय!? मी नुकतेच बाळाला जन्म दिला आहे! हो, माझं वजन वाढलं आहे, जे तुम्हा सर्वांना एक अनैसर्गिक गोष्ट वाटत असेल," असे तिने लिहिले. तिने पुढे असेही म्हटले की, वजन वाढणे हे अति खाण्यामुळे नाही, तर गरोदरपणाला दिलेला एक नैसर्गिक प्रतिसाद आहे, आणि ती अजूनही या गोष्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Patralekha
Avengers: Doomsday Trailer | Iron Man नाही आता विलन! 'एव्हेंजर्स डूम्सडे'मध्ये थॉर-डॉक्टर डूमची थरारक लढत; जुन्या एवेंजर्सच्या सुपरहिरोंचीही एन्ट्री

मी बसून डोंगर खाल्लेला नाही. मी बस एका मुलाला जन्म दिलाय. सोबतच दोन चित्रपटांचे प्रोडक्शन देखील केले आहे. जे कुठलेही सोपे काम नाही. सोबतच पत्रलेखाने आवाहन केले की, 'जर हे माझ्या हातत असत तर मी अशी झाले नसते. पण प्रेग्नेंसी दरम्यान माझ्या शरीराने याप्रकारे प्रतिक्रिया दिली आहे. परमेश्वरासाठी, कृपया थोडे दयाळू बना.'

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

वाढलेले वजन आणि कॉर्ड सेट लूकमध्ये पत्रलेखाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. राजकुमार राव स्टारर 'टोस्टर' चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी तिने उपस्थिती लावली होती. या व्हिडिओवर पापराझी आणि युजर्सनी कमेंट केले होते.

पत्रलेखाने या चित्रपटात केलंय काम

पत्रलेखाला अखेरीस चित्रपट 'फुले'मध्ये पाहण्यात आलं होतं. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. २०२५ मध्ये तिने आपले प्रोडक्शन हाऊस देखील उभे केले. या हाऊस अंतर्गत 'टोस्टर' चित्रपट आणला, जो नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. यामध्ये राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news