Naagin 7 VFX viral clip |'नागिन'च्या एडिटर कडून एक चूक, व्हिडिओ व्हायरल, एकताकडून टीमची पाठराखण

Naagin 7 VFX viral clip | 'नागिन'च्या एडिटर कडून एक चूक, व्हिडिओ व्हायरल, एकताकडून टीमची पाठराखण
Naagin 7 tv serial
Naagin 7 VFX blunder video goes viral pudhari photo
Published on
Updated on
Summary

‘नागिन’ मालिकेतील एका VFX सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकता कपूरला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. एडिटिंगमधील कथित चुकीवरून अनेक मीम्स आणि प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र, या सगळ्यात एकता कपूरने आपल्या एडिटरचे समर्थन करत त्याच्या मेहनतीचे कौतुक केले, त्यामुळे तिची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.

Naagin 7 VFX blunder video goes viral

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नागिन’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कारण ठरले आहे मालिकेतील एक VFX सीन. सोशल मीडियावर या सीनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, एडिटिंगमधील एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी मालिकेसह निर्माती एकता कपूरलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण, ही गोष्ट एकता कपूरने पॉझिटिव्ह घेत मालिकेच्या टीमची पाठराखण केली.

Naagin 7 tv serial
Urvashi Rautela |दबिडी-दबिडी’ गाण्यातील वादग्रस्त स्टेप्सवर अखेर उर्वशीने सोडले मौन; बालकृष्ण नंदमुरींबद्दल म्हणाली...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये VFX आणि एडिटिंगमधील काही चुका स्पष्टपणे दिसताहेत. यानंतर सोशल मीडियावर अनेक मजेशीर मीम्स, कमेंट्स आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले. काही यूजर्सनी मालिकेच्या VFX क्वालिटीवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी ‘नागिन’च्या जुन्या सीनशी तुलना करत खिल्ली उडवली.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

नागिन ७ च्या सेटवरील थेट 'ब्लू-स्क्रीन'चा एक शॉट जो एडिट केला नव्हता, तो थेट प्रसारीत करण्यात आला. हा प्रसंग पाहिल्यानंतर बघता बघता तो व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या.

Naagin 7 tv serial
The Maharashtra Files |शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष उलगडणार ‘द महाराष्ट्र फाईल्स’मध्ये, रिलीज डेट जाहीर

इतकं होऊन देखील एकता कपूरने आपल्या टीमचा बचाव केला. तिने एडिटरला पाठिशी घातलं. तो एडिटर तिच्यासाठी दीर्घकाळ काम करत असल्याने एकताने त्याला पाठिंबा दिला. तो एडिटींगची सर्व कामे करतो, त्यामुळे 'एक वेळ प्रियकर बदलला तरी चालेल, पण एडिटर नाही', असे तिचे म्हणणे आहे. तिने एडिटरचे जाहीरपणे कौतुक देखील केले आहे.

एडिटरबद्दल काय म्हणाली एकता कपूर?

ती म्हणाली, "भेटा विकीजींना; त्यांच्या 'ब्लू-स्क्रीन'च्या चर्चा सध्या संपूर्ण मुंबईत सुरू आहेत. मी माझा प्रियकर बदलू शकते, पण माझ्या आयुष्यातून विकीजींना कधीच बदलू शकत नाही. मी ५० मालिका बनवल्या तरीही, माझ्या प्रत्येक मालिकेत विकीजींचा काही ना काही वाटा असतोच. ते उत्तम एडिटर आहेत...विकीजी, तुम्ही महान आहात. मग ती 'नागीन' मालिका असो किंवा 'क्यूँकी सास भी कभी बहू थी', या माणसाने गेल्या २० वर्षांत आमच्या प्रत्येक मालिकेचे एडिटिंग केले आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news