

‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीच्या संघर्षावर आधारित असून 29 मे 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव, सामाजिक अन्याय आणि न्याय मिळवण्यासाठी चाललेली लढाई या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष आणि ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव परिस्थिती उलगडणारा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ 29 मे 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सामाजिक विषयांवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वास्तवाची जाणीव करून देणारा आणि विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे.
या चित्रपटात महाराष्ट्रातील एका शेतकरी कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे, जे आपल्या जमिनी, हक्क आणि न्यायासाठी दीर्घकाळ संघर्ष करत असते. प्रशासनातील अडथळे, सामाजिक अन्याय आणि आर्थिक संकटे यामधून मार्ग काढत हे कुटुंब आपला लढा पुढे नेते. या कथेतून ग्रामीण भारतातील अनेक वास्तव प्रश्नांना अधोरेखित करण्यात आले आहे.
“द महाराष्ट्र फाईल” हा चित्रपट केवळ एका महिलेच्या संघर्षाची कथा नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेतील छुप्या कार्यपद्धतीचे वास्तव उघड करणारा आरसा आहे. सरकारी कर्मचारी आणि दलालांकडून जनतेची कशी दिशाभूल केली जाते, न्याय कसा लांबवला जातो आणि भ्रष्टाचार कसा बोकाळतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
निर्माते, दिग्दर्शक, लेखन, कथा, पटकथा संजीव कुमार राठोड यांची आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते शालिनी राठोड आहेत. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आर्यन राठोड आहेत. या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाचे संगीत नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी दिले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा सामाजिक जाणिवेवर आधारित असून प्रत्येक दृश्य प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे आहे. ग्रामीण भागातील जीवनशैली, संघर्ष आणि भावनिक पैलू अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले आहेत.