गोड बातमीची घाई! धमाल चित्रपट "एक दोन तीन चार" भेटीला

वेगळ्या आशयाची कहाणी, १२३४ चित्रपट भेटीला
Vaidehi Parashurami 1234 movie
वैदेही परशुरामी हिचा एक दोन तीन चार चित्रपट आज रिलीज झाला Vaidehi Parashurami Instagram

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला "एक दोन तीन चार" या चित्रपट अफलातून आहे. चित्रपटातील जोडपं, समीर आणि सायलीच्या लव्ह स्टोरीच्या आनंदी आयुष्याचं रूपांतर रोलरकोस्टर राईड प्रमाणे वळणावर जातं. वैदेही परशुरामी आणि निपूण धर्माधिकारी अभिनित ही नवी गोड जोडी भेटीला आली आहे.

Vaidehi Parashurami 1234 movie
Abhishek Bachchan|'घटस्फोट पोस्ट'वर एक लाईक; अभिषेक-ऐश्वर्या वेगळे होणार?
Summary

‘मुरांबा‘ सारख्या बहुचर्चित आणि नावाजलेल्या चित्रपटानंतर तरूण दिग्दर्शक वरूण नार्वेकर याचा पुढील चित्रपट कधी येणार याची अनेक दिवस प्रेक्षक वाट पाहत होते. आता प्रतीक्षा संपली आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मित बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांच्या साहाय्याने "एक दोन तीन चार" हा चित्रपट आज १९ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Vaidehi Parashurami 1234 movie
Rashmika Mandanna| खूप आठवण येणार..आपण पुन्हा भेटेन..कुत्र्याच्या निधनानंतर भावूक पोस्ट

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय दाखवलंय?

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो की, अगदी वयाच्या २३ व्या वर्षी सम्या आणि सायली या जोडप्याच लग्न झालंय. पण त्यानंतर लगेचच गोड बातमी सुद्धा येते. आणि ह्या गोड बातमीव्दारे जो एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय त्याने त्यांची जी तारांबळ उडते याची एक धमाल गोष्ट यात पहायला मिळते. ट्रेलर बघताना आधी वाटतं की ह्यांना एक नाही दोन नाही तर चक्क ४ मुलं होणारं आहेत. पण ट्रेलरच्या शेवटी वैदेहीने सहा बाळांची बातमी देऊन गुगली टाकली आहे. आता यांना चार का सहा याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

Vaidehi Parashurami 1234 movie
Janhvi Kapoor| फूड पॉईझनिंग झाल्याने जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल

"एक दोन तीन चार" मधील हे आहेत कलाकार

"एक दोन तीन चार" हा चित्रपट जितका यंग जनरेशन साठी आकर्षक आहे तितकाच तो सर्व कुटुंबासाठी सुद्दा एक मेजवानी ठरणार आहे. कारण प्रत्येक जोडप्याबरोबर सर्व कुटुंबच या प्रवासात सहभागी होत असतं. आणि याच कुटुंबाचा भाग म्हणून या दोघांबरोबर मराठीतील दमदार कलाकार जसं मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकार या कथेतील कुटुंबाचा प्रमुख भाग असणार आहेत.

मुख्य म्हणजे सोशल मीडियाचे आजचे भारताचे नावाजलेले स्टार्स करण सोनावणे आणि यशराज मुखाटे यांनी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. करण पहिल्यांदाच मराठी चित्रपटात एका मुख्य भूमिकेत आहे. तर यशराज मुखाटेने म्युझिक डिरेक्टर म्हणून "एक दोन तीन चार" या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news