Abhishek Bachchan|'घटस्फोट पोस्ट'वर एक लाईक; अभिषेक-ऐश्वर्या वेगळे होणार?

अभिषेक बच्चनची 'घटस्फोट पोस्ट'वर लाईक, ऐश्वर्याशी वेगळे होणार असल्याची चर्चा
Abhishek Bachchan-Aishwarya
ऐश्वर्या-अभिषेक बच्चन वेगळे होणार असल्याची चर्चा रंगली आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानीच्या लग्नात अभिषेक बच्चन आपल्या संपूर्ण परिवारासोबत पोहोचला होता. यावेळी अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन होते. पण, ऐश्वर्या दिसली नाही. ती आपली मुलगी आराध्या सोबत एकटी नंतर पोहोचली होती. दरम्यान, आता अभिषेक बच्चनने एका घटस्फोटाच्या पोस्टवर लाईक केल्याने त्यांची वेगळे होण्याची चर्चा होत आहे.

Abhishek Bachchan-Aishwarya
Rashmika Mandanna| खूप आठवण येणार..आपण पुन्हा भेटेन..कुत्र्याच्या निधनानंतर भावूक पोस्ट
Summary

याआधीही अनेकदा ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत दिसायची. बाकी बच्चन परिवार तिच्यासोबत नसायचा. कधी अभिषेक ऐश्वर्यासोबत नसायचा. दरमयान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चेने पुन्हा गती घेतली आहे. अभिषेक बच्चनने एक पोस्ट लाईक केलं. ती पोस्ट घटस्फोटाशी संबंधित होती. ते पाहून फॅन्स चिंतेत आहेत.

Instagram

अभिषेकने जी पोस्ट लाईक केली आहे, त्यात काय लिहिलंय?

अभिषेक बच्चनने जी पोस्ट लाईक केली आहे, त्या फोटोमध्ये एक ब्रोकन हार्ट इमोजी आहे. ज्यामध्ये पती-पत्नी वेगळे होताना दिसत आहेत. फोटोवर लिहिलं-जेव्हा प्रेम सहज राहत नाही. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘घटस्फोट कुणासाठी इतकं सोपं ठरत नाही. कोण नेहमी खुश राहण्याचे स्वप्न नाही पाहत वा रस्ता पार करताना हात पकडलेल्य वृद्ध जोडप्याचा मनाला भावणारा व्हिडिओ रीक्रिएट करू इच्छित नाही? पण तरीही कधी-कधी जीवन तसे होत नाही. जसे की आम्ही अपेक्षा करतो...जेव्हा लोक अनेक वर्षे सोबत घालवल्यानंतर वेगळे होतात, तेव्हा आपल्या आयुष्याचा मोठा हिस्सा छोट्या आणि मोठ्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून राहतात..याचा सामना कसा करतात? काय काय आव्हानांना ते सामोरे जात असतील?’

Abhishek Bachchan-Aishwarya
Janhvi Kapoor| फूड पॉईझनिंग झाल्याने जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल

अभिषेक बच्चनने नंतर हटवलं लाईक

एका युजरनेही पोस्ट शेअर केली होती आणि जेव्हा त्या पोस्टवर अभिषेक बच्चनचे लाईक आले त्यावेळी त्याचे स्क्रीनशॉट इन्स्टा स्टोरीवर शेअर करण्यात आले होते. अभिषेक बच्चनने ही पोस्ट लाईक केल्याने त्याच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा रंगली. लोकांनी अनुमान लावणे सुरु केले की, आता अभिषेक आणि ऐश्वर्या सोबत नाही. पण, नंतर अभिषेक बच्चनने या पोस्टवरून आपले लाइक हटवलयाचे समजते.

Abhishek Bachchan-Aishwarya
Urvashi Rautelaचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक! मॅनेजरसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news