.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : रश्मिका मंदानाच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाले आहे. रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं आहे. ‘मॅक्सी’ने आज जगातून निरोप घेतला, असे म्हणत तिने इन्स्टा स्टोरावर एक फोटो पोस्ट केला. आपल्या मॅक्सीसोबत आणि सर्वात चांगला मित्र ‘मॅक्सी’साठी इमोशनल पोस्ट लिहिलं आहे.
रश्मिका मंदाना मॅक्सीवर खूप प्रेम करायची. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मॅक्सीसोबतचे तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात. ती नेहमी फोटो शेअर करायची. अनेक फॅन्सनी तिच्या या पोस्टवर सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली कॉमेंट दिली आहे.
ती आपल्या पोस्टमध्ये लिहिते, ‘परमेश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो. माझ्या सर्वात चांगला मित्र आणि छोटा मॅक्सी. आम्हाला तुझी खूप आठवण येणार आणि मला अपेक्षा आहे की, आपण लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत अलविदा’.
साऊथ इंडस्ट्रीमध्ये ‘पुष्पा’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ॲनिमल हा तिचा हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ‘गुडबाय’, ‘मिशन मजनू’ या हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.