Janhvi Kapoor| फूड पॉईझनिंग झाल्याने जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल

जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल
Janhvi Kapoor hospitalised
जान्हवी कपूर उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली आहेJanhvi Kapoor Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री जान्हवी कपूरला आज, गुरुवार, १८ जुलै रोजी अन्नातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झाल्याने जान्हवी कपूरला तिचे शूटिंगचे आणि इतर कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. शूटिंग पूर्ण करणे, एक चित्रपट पूर्ण करणे आणि दुसऱ्या चित्रपटात उतरण्यापूर्वी त्याचे प्रमोशन करणे. शिवाय, मेजवानी आणि विवाहसोहळ्यांना उपस्थित राहणे आदी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

Janhvi Kapoor hospitalised
रितेश देशमुखची 'लयभारी बॉसगिरी', मराठी बिग बॉस लवकरच

रिपोर्टनुसार, तिची एक जवळची मैत्रीणीने माहिती दिली की, “अन्नातून विषबाधा झाली आहे. बुधवारी जान्हवी घरी झोपून होती. तिला खूप अशक्तपणा होता आणि ती चिंतेत होती. तिने बुधवारी आणि उर्वरित आठवड्यासाठी तिच्या सर्व भेटी पुढे ढकलल्या. गुरुवारी तिची आणखी तब्येत बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि तिला रुग्णालयात दाखल केले. ती आता बरी होत आहे. पण, तिला अशक्तपणा आहे. तिला शुक्रवारपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे.”

Janhvi Kapoor hospitalised
केसांना विग, हसतमुख चेहऱ्याने हिना खान परतली कामावर

जान्हवीचा आगामी चित्रपट उलझ येतोय. काही दिवसांपूर्वीच तिचा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सुहाना भाटिया असे तिच्या पात्राचे नाव आहे.

Janhvi Kapoor hospitalised
Urvashi Rautelaचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक! मॅनेजरसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news