Akanksha Puri : मिकाची गर्लफ्रेंड ब्लॅक मोनोकिनीमध्ये उतरली पाण्यात ?

Akanksha Puri : मिकाची गर्लफ्रेंड ब्लॅक मोनोकिनीमध्ये उतरली पाण्यात ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा गायक मिका सिंह (Mika Singh)ची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी ( Akanksha Puri ) पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी आकांक्षा मिका सिंहमुळे नव्हे तर ती तिच्या ग्लॅमरस आणि सिजलिंग लूकने चर्चेत आहे. आकांक्षाने ब्लॅक रंगाच्या मोनोकनीत फोटोशूट केलं आहे. तिचे सध्या फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

आकांक्षा पुरीने ( Akanksha Puri ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या मोनोकनीमधील काही हॉट फोटो शेअर केले आहेत. यातील खास म्हणजे, आकांक्षाने फोटोला किलर पोझ दिली असून, ती चक्क पाण्यात बसलेली हॉट दिसतेय. मोकळे आल्या केसांची स्टाईल, ब्लॅक आयशॅडो आणि न्यूड लिपस्टिकने तिचे सौंदर्य खुलून दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'When the sun goes down, I glo up ?'. लिहिले आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह मिका सिंहने भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया देताना कॉमेन्टस केल्या आहेत. यात रिनू मॅथ्यूने तीन फायरचे ईमोजी आणि मिका सिंहने तीन फायर आणि दोन लव्हली ईमोजी शेअर केले आहेत. तर एका युजर्सने 'So beautiful❣️', 'Uuuffff ???', 'Hot ?❤??', 'Stunning ?', 'okay Finally..!! Killing it. #killerr ?????❤❤❤❤that's it'. 'love it, Beautiful ??', 'Hot ?❤??', 'woah', 'GLAMOROUS QUEEN ?' यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

याशिवाय काही नेटकऱ्यांनी आकांक्षा पुरीच्या फोटोवर ईमोजींचा पाऊस पाडला आहे. या फोटोला आतापर्यन्त जवळपास १६०० जणांनी लाईक्स केले आहे. आकांक्षाच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक नवनवीन फोटो पाहायला मिळतात. आकांक्षा आणि मिकाच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही गेल्या १०-१२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मिकाच्या स्वयंवर शोमध्ये इतर मुलींसोबत वाईल्ड कार्ड एन्ट्री घेवून आकांक्षा पूरी आली होती. यानंतर मिकाने आकांक्षाची निवड करण्‍यात आली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news