Priya Prakash : 'विंक गर्ल' प्रिया प्रकाशचे 'बाथटब' फोटोशूट | पुढारी

Priya Prakash : 'विंक गर्ल' प्रिया प्रकाशचे 'बाथटब' फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरने (Priya Prakash ) इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फाेटाे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी तिने बेडरूममधून लाल रंगाच्या हॉट ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले होते. प्रिया प्रकाश वारियर तिच्या एका व्हिडिओने रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली होती. (Priya Prakash )

प्रिया दक्षिणेतील प्रसिद्ध चेहरा आहे. शाळेतील विद्यार्थीनीची भूमिका साकारत तिने सर्वांनाच आपल्या अभिनयाने वेड लावले. तिने आपल्या सौंदर्यामुळे आणि मेहनतीने आपली प्रतिमा निर्माण केलीय. आता तिने बाथटबमधील फोटो शेअर केले आहेत. टाईट शॉर्ट ब्लॅक ड्रेसमधील फोटो तिने इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेय. केसांची वेणी, लाल लिपस्टिक आणि न्यूड मेकअपमध्ये तिने हा फोटोशूट केलाय. तिने या फोटोशूटला Stay calm and keep your opinions to yourself Or not अशी कॅप्शन दिलीय.

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचे लेदर जॅकेट घातले आहे. बाथटबमध्ये ती आपली अदा दाखवत आहे. तिची क्रेझ फॅन्समध्ये अजूनही आहे.

प्रियाने आणखी काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती प्रिंटेड शर्टमध्ये दिसते. You’re just a silhouette Burning at dusk Without my light🌻 अशी कॅप्शन लिहित तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

हेदेखील वाचा-

 

 

Back to top button