Vandana Gupte : ‘आमने-सामने’ नाटकाच्या वादावर वंदना गुप्ते आक्रमक! : ‘असा अपमान लीना-मंगेश तुम्हाला सहन झाला असता का?’

Aamne Saamne natak Controversy : नाट्यसृष्टीतील वादावर ज्येष्ठ अभिनेत्रीचे खडे बोल! : वंदना गुप्तेंनी निर्मात्यांसह तरुण कलाकारांचेही टोचले कान
Vandana Gupte : ‘आमने-सामने’ नाटकाच्या वादावर वंदना गुप्ते आक्रमक! : ‘असा अपमान लीना-मंगेश तुम्हाला सहन झाला असता का?’
Published on: 
Updated on: 

मुंबई : मराठी रंगभूमीवर तुफान गाजणाऱ्या ‘आमने-सामने’ या नाटकातील कलाकारांमधील अंतर्गत वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. मानधनवाढीच्या मुद्द्यावरून अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांना अचानक नाटकातून डच्चू देण्यात आल्याने दोन्ही बाजूंनी सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. या प्रकरणावर नाट्यसृष्टीत दोन तट पडले असतानाच, आता ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी अत्यंत थेट शब्दांत भूमिका मांडत निर्माते आणि तरुण कलाकार या दोघांनाही खडे बोल सुनावले आहेत.

"तुमच्या जागी तुम्ही असता तर हा अपमान सहन झाला असता का?"

नाटकाचे निर्माते आणि मुख्य कलाकार मंगेश कदम व लीना भागवत यांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून दुःख झाल्याचे सांगत वंदना गुप्ते म्हणाल्या, "तुमचं रडणं पाहून मला वाईट वाटलं. पण आपणही कलाकार आहोत आणि याच संघर्षातून गेलो आहोत, हे आपण विसरता कामा नये. सुरुवातीच्या काळात एका प्रयोगाचे मानधन ८० रुपयांवरून १०० रुपये व्हावे, यासाठी मी दिवंगत निर्माते मोहन वाघ यांच्याकडे १५ वेळा मागणी केली होती; तेव्हा कुठे शंभराव्या प्रयोगाला त्यांनी माझे मानधन वाढवले होते. तरुण कलाकारांनी त्यांच्या योगदानाचा विचार करून वाढ मागितली, तर त्यात गैर काहीच नाही. एखाद्या कलाकाराला 'हा तुमचा शेवटचा प्रयोग आहे' असे थेट सांगून अचानक बाहेरचा रस्ता दाखवणे अत्यंत चुकीचे आहे. असा अपमान लीना किंवा मंगेश तुमच्या बाबतीत घडला असता, तर तुम्हाला तो सहन झाला असता का?"

Vandana Gupte : ‘आमने-सामने’ नाटकाच्या वादावर वंदना गुप्ते आक्रमक! : ‘असा अपमान लीना-मंगेश तुम्हाला सहन झाला असता का?’
Aamne Samne: 'फक्त दीड हजारांसाठी तडकाफडकी…', रोहन गुजर-केतकी विलासचा संताप; निर्मात्यांचा मेसेजही केला उघड, पाहा व्हिडिओ

"तीन-तीनदा वाढ मागताना तरुणांनीही विचार करायला हवा होता"

निर्मात्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढतानाच वंदना गुप्ते यांनी रोहन गुजर आणि केतकी विलास यांचेही कान टोचले. एकाच नाटकात काम करताना वारंवार (तीन वेळा) मानधनवाढीचा हट्ट धरणे कितपत योग्य आहे, याचा विचार तरुण कलाकारांनीही करायला हवा होता, असे त्या म्हणाल्या. मात्र, पाच वर्षे सोबत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सहकलाकारांना एका क्षणात प्रयोगातून बाजूला करणे कोणत्याही कलाकाराला शोभत नाही, अशी स्पष्ट टिप्पणी त्यांनी केली.

Vandana Gupte : ‘आमने-सामने’ नाटकाच्या वादावर वंदना गुप्ते आक्रमक! : ‘असा अपमान लीना-मंगेश तुम्हाला सहन झाला असता का?’
Aamne Saamne : हा तुमचा शेवटचा प्रयोग होता.. रोहन अन् केतकीची 'आमने सामने' नाटकातून अचानक Exit; रस्त्यावर बसून केला VIDEO

"कलाविश्वाची प्रतिष्ठा जपा, वाद थांबवा"

स्वतःच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा संदर्भ देत त्या पुढे म्हणाल्या, "मी ५० वर्षे या क्षेत्रात काम करत आहे, तरीही आजही मानधन वाढवून मागताना मला संकोच वाटतो. पण आजची नवी पिढी स्वतःच्या अधिकारांबाबत जागरूक आहे. नाटकात आपलाही हातभार आहे आणि त्यातून हक्काचा मोबदला मिळावा ही त्यांची अपेक्षा वावगी नाही. मात्र, अशा प्रकारचा जाहीर वाद आणि सोशल मीडियावरील तमाशा संपूर्ण रंगभूमीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा आहे." ही कटुता आणखी न ताणता दोन्ही बाजूंनी सामंजस्याने या वादावर पडदा टाकावा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.