Aamne Saamne : हा तुमचा शेवटचा प्रयोग होता.. रोहन अन् केतकीची 'आमने सामने' नाटकातून अचानक Exit; रस्त्यावर बसून केला VIDEO

एक चांगला गुडबाय डिझर्व्ह करत होतो... रोहन अन् केतकीने निर्मात्यांवर साधला निशाणा
Aamne Saamne Marathi Play
Aamne Saamne Marathi Playpudhari
Published on: 
Updated on: 

Aamne Saamne Marathi Play Controversy: आमने सामने या प्रसिद्ध अन् गाजलेल्या नाटकातून मराठी कलाकार रोहण गुजर आणि केतकी विलास-पालाव यांनी रसिकांचे अनेक वर्षे मनोरंजन केलं. मात्र आता हे दोघेही या नाटकात दिसणार नाहीत. १८ ऑक्टोबरला रविंद्र नाट्य मंदिरला झालेला प्रयोग हा त्यांचा या नाटकाचा शेवटचा प्रयोग होता. यानंतर इन्स्टाग्रावरून रोहन आणि केतकी यांनी आता आपण हे नाटक करणार नाही असं सांगितलं.

अचानक त्यांनी ही घोषणा केल्यानं सर्वांना मोठा धक्का बसला आहे. कारण रोहन जवळपास ७ वर्षे तर केतकी गेल्या ५ वर्षापासून हे नाटक करत होते. या नाटकाचे शो हाऊस फुल जात होते. कधी कधी नाटकांची तिकीटे ब्लॅकने देखील विकली गेल्याचे रोहनने सांगितलं. या दोघांनी नाटक सोडण्याचं कारण निर्मात्यांसोबत पैशावरून झालेला वाद असल्याचं सांगण्यात येत आहे.

Aamne Saamne Marathi Play
Marathi Theatre: नव्या वर्षातही रंगभूमीचा ‘शो मस्ट गो ऑन’

नाटकासाठी इतकी वर्षे देऊनही...

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत रोहन आणि केतकी यांनी ही बातमी दिली. यावेळी रोहन आणि केतकी यांनी आम्ही नाटकला एवढी वर्षे दिली मात्र या नाटकाला या नाटकावर प्रेम करणाऱ्या रसिकांना चांगल्या प्रकारे गुडबाय करता आलं नाही अशी सल देखील मनात असल्याचं सांगितलं.

केतकी व्हिडिओत म्हणते, 'आता भेटूयात आमने सामने हे वाक्य आम्ही आता कधीच बोलू शकणार नाही. त्यावर रोहन म्हणतो इथून पुढे आम्ही दोघे आमने सामने या नाटकाचा भाग नसणार आहोत.' केतकीने या नाटकाचे जवळपास ५२० तर रोहनने ६६० ते ६७० प्रयोग केले आहेत. त्यामुळं एक चांगला गुडबाय आम्ही डिझर्व्ह करतो असं रोहन म्हणतो.

Aamne Saamne Marathi Play
Ahilyadevi Holkar Jayanti: पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात; ‘पुण्यश्लोक’ महानाट्याला प्रचंड प्रतिसाद

१८ ऑक्टोबरच्या प्रयोगानंतर काय झालं?

यानंतर केतकीने १८ ऑक्टोबरला प्रयोगानंतर नेमकं काय झालं हे सांगितलं. ती म्हणजे. १८ ऑक्टोबरला रविंद्र नाट्य मंदिरात आमचा प्रयोग झाला. तो प्रयोग झाल्यावर आमची एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की हा तुमचा शेवटचा प्रयोग होता.'

थोडीशी भावूक झालेली केतकी म्हणते की या नटाकाने आम्हाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम दिलं आहे. काहींनी तर २५ - २५ वेळा हे नाटक पाहिले आहे. रोहनच्या मते या नाटकाची तिकीटे ब्लॅकने देखील विकली गेली आहे. रोहनच्या वडिलांनी तर हे नाटक ११ वेळा पाहिलं आहे. मात्र आम्ही आमचा शेवटचा प्रयोग सेलिब्रेट करू शकणार नाही. हे असं झालं आहे की तुझ्या सुरळीत चालणाऱ्या आयुष्यातून तुला उचलून एका दुसऱ्या ठिकाणी ठेवलं आहे. हे पूर्वकल्पना न देता करणं खूप त्रासदायक आहे असं केतकी सांगते.

Aamne Saamne Marathi Play
Kamali Ketaki Kulkarni | 'कमळी'ची खलनायिका 'अनिका' केतकी कुलकर्णीचे ५ वर्षांनंतर पुनरागमन

मानधन हाच मुद्दा

त्यानंतर रोहनने हे नाटक सोडण्याचं काही अपरिहार्य कारण नाही, पैसे हे कारण असून मानधनावरून आम्ही वेगळे होत आहोत असा बॉम्ब फोडला. त्यावेळी केतकी त्याला हे सांगायचं नव्हतं असं म्हणते. मात्र रोहन कोणताही आडपडदा न ठेवता सर्व सार्वजनिक करतो. तो रक्कम देखील सांगण्यास तयार होता मात्र केतकी त्याला थांबवते. केतकी म्हणजे पैशामुळे आपण बऱ्याचवेळा प्रोजेक्ट सोडतो असे म्हणते.

अखेर रोहन आणि केतकी यांनी असा व्हिडिओ करणं गरजेचं होतं. आमच्याकडून एक अधिकृत माहिती प्रेक्षकांपर्यंत जाणं गरजेचं होतं. म्हणून हा व्हिडिओ केला असं सांगितलं. केतकीने रोहनला आपण पुन्हा एखाद्या नाटकात एकत्र काम करू असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news