मनोरंजन
Shrutii Marrathe : अभिनेत्री श्रृती मराठे बद्दल जाणून घ्या ‘या’ गोष्टी…
अभिनेत्री श्रृती मराठेने (Shrutii Marrathe) छोटा पडद्याबराेबरच मोठा पडदाही आपल्या अभिनयाने गाजवला आहे.
श्रृतीने २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सनई चौघडे' या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
(Shrutii Marrathe) तिने मराठी बरोबरच साउथ इंडस्ट्रीमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. साउथ इंडस्ट्रीमध्ये तिला श्रृती प्रकाश या नावाने ओळखली जाते.
'सत्य, सावित्री आणि सत्यवान', 'सनई चौघडे', 'तुझी माझी लवस्टोरी' 'असा मी तसा मी', 'रमा माधव', 'लागली पैज', 'तिचा बाप, त्याचा बाप', 'शुभ लग्न सावधान', 'प्रेमसुत्र', 'आरवन' या चित्रपटात श्रृती मराठेने (Shrutii Marrathe) विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तर दाक्षिणात्य चित्रपट इंदिर विळा आणि विडियलमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी पैकी एक जोडी म्हणजे श्रृती आणि गौरव घाटणेकर. 'तुझी माझी लवस्टोरी' च्या सेटवर या दोघांची लव्हस्टाेरी सुरू झाली. श्रृती आणि गौरव ४ डिसेंबर २०१६ ला विवाहबंधनात अडकले. दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. गौरव सुध्दा एक उत्कृष्ट अभिनेता आहे.
त्याच बरोबर तिने (Shrutii Marrathe) 'राधा ही बावरी', 'संत सखु', 'एकापेक्षा एक' या मराठी मालिंकामध्ये
श्रृती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो, व्हिडोओ, सेटवरील किस्से शेअर करत असते. चाहत्यांना घायाळ करणार्या तिच्या अदा असतात. तिचे हटके फोटो चाहत्यांच्या पसंदीस उतरतात.
श्रृती (Shrutii Marrathe) पारंपरिक लूक बरोबरच वेस्टर्न लूकमध्येही तितकीच सुंदर दिसते. तिने आपल्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
आज श्रृतीचा (Shrutii Marrathe) वाढदिवस, श्रृती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

