बारामती : अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर छापे; राष्‍ट्रवादीकडून निषेध | पुढारी

बारामती : अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर छापे; राष्‍ट्रवादीकडून निषेध

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर खात्याने घातलेल्या छाप्याचा बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. येथील भिगवण चौकात पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, तालुकाध्यक्षा वनिता बनकर, युवती अध्यक्षा आरती शेंडगे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बाजार समितीचे वसंतराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य विश्वास देवकाते यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आंदोलनावेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आम्ही अजित पवार यांच्यासोबत आहोत, असे जाहीर केले. तसेच आयकर विभागाच्या धाडीमुळे केंद्र सरकारचा निषेध केला.

केंद्र सरकार सूडभावनेतून अशी छापेमारी करत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Back to top button