Mahakali Teaser | 'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अंगावर शहारे आणणारा अवतार, 'महाकाली'च्या टीझरमध्ये 'शुक्राचार्यां'ची पहिली झलक

Mahakali Teaser | 'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अंगावर शहारे आणणारा अवतार, 'महाकाली'च्या टीझरमध्ये 'शुक्राचार्यां'ची पहिली झलक
Akshaye Khanna
Mahakali Teaser
Published on
Updated on
Summary

‘महाकाली’च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असून अक्षय खन्नाचा शुक्राचार्यांच्या भूमिकेतील दमदार आणि रौद्र अवतार चर्चेचा विषय ठरत आहे. ‘धुरंधर’मधील भूमिकेनंतर अक्षय खन्नाचा हा वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमधील त्याचा भेदक लूक, व्यक्तिमत्त्व आणि पडद्यावरील उपस्थितीने सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अक्षय खन्‍नाचा चित्रपट 'महाकाली'चा खतरनाक टीझर रिलीज झाला आहे. 'धुरंधर'च्या रिलीजनंतर अक्षय खन्नाची चलती आहे. आता तो मोठ्या पडद्यावर महागुरु शुक्राचार्य यांच्या अवतारात दिसणार आहे. नुकताच रिलीज झालेल्या २ मिनिट ५३ सेकंदाच्या या टीझरमध्ये अक्षय खन्‍नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'हनु-मॅन' फेम प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पुढील चित्रपट 'महाकाली'मध्ये अक्षय खन्ना शुक्राचार्यांच्या भूमिकेत जबरदस्‍त दिसत आहे.

पहिल्या झलकमध्ये तो घोषणा करताना दिसतो की, पुढील १४ दिवसांत मानवजातीचा सर्वनाश होईल आणि असुरांचा विजयघोष होईल. अखेरच्या शेवटी काही सेकंदामध्ये भूमि शेट्टीचा 'महाकाली' अवतारही अंगावर शहारे आणणारा आहे. निर्मात्यांनी सोमवारी 'महाकाली'ची पहिल्या झलकसोबतच चित्रपटाची रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे. 'महाकाली’ पुढील वर्षी ८ जानेवारी, २०२७ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

'महाकाली'ची ही पहिली झलक, धर्म आणि अधर्मच्या मध्ये अशा एका महायुद्धाकडे इशारा करत आहे, जो केवळ चांगुलपणा आणि वाईट शक्तीच्या लढाईपर्यंत मर्यादित नाही. हा शक्तिशाली गुरु शुक्राचार्यांच्या नेतृत्वात सुरु होणारा संघर्ष आहे. जवळपास ३ मिनिटांच्या या टीझरमध्ये युद्धाचा भयानक इशारा आणि रहस्यमयी वातावरणाच्या मध्ये अक्षय खन्‍नाचा शुक्राचार्य अवतार पाहण्यासारखा आहे.

महागुरु शुक्राचार्य म्हणताना दिसतात-समुद्रमंथनादरम्यान देव आणि दानवांनी समान कष्ट केल्यानंतर, विष्णूने केवळ देवांनाच अमृत दिले. हा धर्म आहे की अधर्म? आम्हाला इंद्राच्या सिंहासनापासून वंचित केले गेले. हा धर्म आहे की अधर्म? संपूर्ण असुर वंशाला पाताळात ढकलले गेले आणि चौदा लोकांचे दरवाजे बंद केले गेले. हा धर्म आहे की अधर्म?

पुढे टीझरमध्ये, शुक्राचार्य गर्जना करतात, "फक्त १४ दिवसांत, राक्षसांचा विजयघोष आपल्या कानांत घुमेल आणि आपण कायमचे स्वतंत्र होऊ! रक्तबीज... मानवजातीचा नाश कर." हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अक्षय खन्नाने या फर्स्ट लूकमध्ये शुक्राचार्याच्या आपल्या भीतीदायक आणि शक्तिशाली भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चाहतेही त्याच्या प्रेमात पडत आहेत. टीझरच्या अख‍ेरच्या काही सेकंदमध्ये महाकालीच्या भूमिकेत भूमि शेट्टीची झलक देखील अंगावर शहारे आणणारा आहे.

अक्षय खन्‍नाला यूजर्सकडून पसंती

एका युजरने लिहिलं- 'अक्षय खन्‍ना दिवसेंदिवस बहरत चालला आहे.' आणखी एकाने लिहिलं , 'हे अंगावर शहारे आणणारा आहे.' दुसऱ्या एका युजरने भूमी शेट्टीच्या सीनसाठी लिहिलं- '2:42 सीन पाहून अंगावर काटा आणणारा आहे. अक्षय खन्ना, प्रशांत वर्मा, महाकाली मूवीला माझा संपूर्ण पाठिंबा आहे.'

Akshaye Khanna
Drishyam The Conclusion|'माझ्यासाठी माझं कुटुंबच सर्व काही,' अजय देवगणची दृश्यम-३ची मोठी घोषणा, नव्या टायटलसह परततोय विजय साळगावकर

'महाकाली' रिलीज डेट आणि कास्‍ट

आरके दुग्गल द्वारा प्रस्तुत आणि आरकेडी स्टुडिओज अंतर्गत बॅनर खाली हा चित्रपट आहे. रिवाज रमेश दुग्गल द्वारा निर्मित ‘महाकाली’चे दिग्दर्शन पूजा अपर्णा कोल्लूरुने केलं आहे. चित्रपटात अक्षय खन्ना सोबत भूमि शेट्टी, श्रिया रेड्डी, रोहित सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘महाकाली’ ८ जानेवारी, २०२७ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

Akshaye Khanna
Actress Asha Singh Jaiswal Death | महाभारत फेम दिग्गज अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news