Drishyam The Conclusion|'माझ्यासाठी माझं कुटुंबच सर्व काही,' अजय देवगणची दृश्यम-३ची मोठी घोषणा, नव्या टायटलसह परततोय विजय साळगावकर

Drishyam The Conclusion| 'माझ्यासाठी माझं कुटुंबच सर्व काही आहे..' अजय देवगणची दृश्यम ३ ची मोठी घोषणा, नव्या टायटलसह परततोय विजय साळगावकर
Ajay Devgn
Producer Drishyam The Conclusion announced pudhari photo
Published on
Updated on

बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दृश्यम 3’ बाबत अखेर मोठी बातमी समोर आली आहे. अजय देवगणचा चर्चित चित्रपट दृश्यमच्या तिसऱ्या भागाची निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली. विजय साळगावकर बनून अजय देवगण पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला येत आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री तब्बू आणि श्रिया सरन देखील चित्रपटात दिसणार आहेत. आता तिसऱ्या भागाचं नावदेखील जाहीर करण्यात आलं आहे.

Ajay Devgn
Kareena Kapoor Pregnancy : तिसऱ्या प्रेग्नन्सीवर करीना कपूरने दिली प्रतिक्रिया.. म्हणाली.. ‘हट ना बे’

‘दृश्यम: द कन्क्लुजन’

‘दृश्यम 3’ आता ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी अजय देवगणचा एक पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली. पोस्टरमध्ये अजय विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे. २४ ऑगस्ट रोजी अजय देवगणने 'दृश्यम: द कन्क्लुजन'चे पहिले पोस्टर प्रदर्शित केले गेले आहे. या पोस्टरवर "माझे सत्य, माझा अधिकार, फक्त माझे कुटुंबच आहे" (Mera Sach, Mera Sahi, Sirf Meri Family Hai) ही ओळ लिहिली आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

‘दृश्यम: द कन्क्लुजन’ २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकत दिसणार आहे. त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, प्रकाश राज, जयदीप अहलावत आणि रजत कपूर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

फर्स्ट लूक टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस

याआधीच प्रदर्शित झालेल्या 'फर्स्ट-लूक टीझर'मध्ये पुढील कथानकाची झलक मिळाली होती, ज्यात अजय देवगणचा आवाज ऐकू येतो. त्यात तो म्हणताना ऐकू येतं की, "जग मला अनेक नावांनी ओळखते-गुन्हेगार, खुनी, कपटी, धूर्त, फसवणूक करणारा, नायक, निर्दोष, पिता आणि मास्टरमाईंड. पण मला त्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. कारण गेल्या सात वर्षांत जे काही घडले, जे काही मी केले, पाहिले किंवा जगाला दाखवले, त्यातून मला एक गोष्ट समजली: या जगात प्रत्येक व्यक्तीचे सत्य वेगळे असते आणि त्यांचे अधिकारही वेगळे असतात. माझे सत्य आणि माझा अधिकार म्हणजे माझे कुटुंब. जोपर्यंत गोष्टी थांबत नाहीत आणि जोपर्यंत समोरचे लोक अपयशी ठरत नाहीत, तोपर्यंत मी इथे एका पहारेकऱ्याप्रमाणे आणि भिंतीप्रमाणे ठाम उभा राहीन."

Ajay Devgn
Bollywood Drug Racket : शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील अभिनेत्याला थेट शूटिंग सेटवरून बेड्या; ५.६० लाखांचे ड्रग्ज जप्त

या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तब्बू 'आयजी मीरा देशमुख' आणि श्रिया सरन 'नंदिनी'च्या भूमिकेत दिसेल. रजत कपूरही यात पुन्हा दिसणार आहे. प्रकाश राज आणि जयदीप अहलावत नव्या भूमिकांमध्ये दिसतील. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या त्याचे 'पोस्ट-प्रोडक्शन'चे काम सुरू आहे.

विजय साळगावकरचं सत्य समोर येणार?

‘दृश्यम’च्या पहिल्या दोन भागांमध्ये विजय साळगावकरने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पोलिसांना चकवा देत योजना आखल्या होत्या. मात्र आता तिसऱ्या भागातच ‘द कन्क्लुजन’ असल्याने विजयच्या कथेत काय ट्विस्ट येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, साऊथ स्टार मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांचा 'दृश्यम ३' हा साऊथ चित्रपट २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात सुमारे ४३.३७ कोटी रुपयांची सुरुवातीची कमाई केली आणि जागतिक स्तरावर २४२ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत यश मिळवले होते. यामुळे 'दृश्यम' मालिकेतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news