Actress Asha Singh Jaiswal Death | महाभारत फेम दिग्गज अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन

Actress Asha Singh Jaiswal Death | महाभारत फेम दिग्गज अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन
Actress Asha Singh Jaiswal
Actress Asha Singh Jaiswal passed away P udhari photo
Published on
Updated on
Summary

‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेत कृपीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे 22 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईत निधन झाले. त्यांनी रात्री साडेसातच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा आकाश यांनी सोशल मीडियावरून दिली. अभिनयासोबतच त्या भारतातील पहिल्या महिला मिमिक्री कलाकारांपैकी एक म्हणून ओळखल्या जात होत्या आणि मीना कुमारी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यासाठीही प्रसिद्ध होत्या.

टीव्ही वरील लोकप्रिय मालिका महाभारत मधून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही माहिती त्यांच्या मुलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

Actress Asha Singh Jaiswal
Bollywood Drug Racket : शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील अभिनेत्याला थेट शूटिंग सेटवरून बेड्या; ५.६० लाखांचे ड्रग्ज जप्त

बी आर चोपडा यांची आयकॉनिक मालिका महाभारतसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिग्गज अभिनेत्री आशा यांनी काम केलं होतं. शनिवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मागवली. त्या ८३ वर्षांच्या होत्या. आशा यांचा मुलगा आकाश सिंहने याची संपूर्ण माहिती इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली.

दिग्गज कलाकार होत्या आशा सिंह

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशा सिंह जयसवाल दीर्घकाळ आजारी होत्या. आकाश सिंहने लिहिलं - चरित्र अभिनेत्री, समाजसेविका आणि भारताची पहिली महिला मिमिक्री आर्टिस्ट (मीना कुमारी यांच्या आवाजाची नक्कल करणारी कलाकार) आणि भारताच्या पहिल्या अंतरराष्ट्रीय एंटरटेनमेंट मॅनेजमेंट कंपनी आशा इवेंट्स अँड फिल्म्सच्या संस्थापिका, मालकिण आणि संचालिकाचे २२ ऑगस्ट, २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले.

Actress Asha Singh Jaiswal
Drishyam The Conclusion|'माझ्यासाठी माझं कुटुंबच सर्व काही,' अजय देवगणची दृश्यम-३ची मोठी घोषणा, नव्या टायटलसह परततोय विजय साळगावकर

''त्या एक अत्यंत मेहनती आणि खंबीर स्त्री होत्या. कृपया तिच्या आत्म्याच्या शांती आणि मुक्तीसाठी प्रार्थना करा. तसेच, कृपया सोशल मीडियावर त्यांचे कार्य पाहा आणि त्यांचे आठवण ठेवा, जेणेकरून त्यांचा आत्मा जिथे कुठे असेल, तिथे लोक त्यांना अजूनही पाहत आहेत आणि त्यांची आठवण ठेवत आहेत हे जाणून त्याला आनंद मिळेल. त्यांचे कार्य हेच तिच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे होते. हा संदेश या आशेने दिला जात आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर हे कार्य त्यांना शांती आणि मुक्ती मिळवून देईल. मृत्यूचे दुःख नव्हे, तर ब्रह्मानंदाच्या दिशेने होणारा प्रवास-हाच तिचा संदेश होता.''

अश्वत्थामाच्या आईच्या भूमिकेत

आशा सिंह यांनी महाभारतमध्ये कृपी ही भूमिका साकारली होती, जी गुरू कृपाचार्य यांची बहिण, गुरू द्रोणाचार्य यांची पत्नी आणि योद्धा अश्वत्थामा यांची आई होती. ती १९७० पासून इंडस्ट्रीमध्ये काम करत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news