दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि पत्नी ज्योतिका यांचा मुलांसोबतचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेहमी वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवणारे हे स्टार कपल या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या चर्चेत आले आहे. चाहत्यांकडून त्यांच्या साधेपणाचे आणि कौटुंबिक नात्याचे कौतुक केले जात आहे.
दाक्षिणात्य स्टार सूर्या सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण आहे त्याचा त्रिशा कृष्णन सोबतचा चित्रपट करुप्पु. त्याच्या कारकिर्दीतील हा अत्यंत यशस्वी क्षण असून आथा त्याच्या फॅमिलीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'करुप्पू' (Karuppu) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांतच जगभरात २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
(video - Kerala Suriya Fans - KSF ™, Anbu x account)
आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याची पत्नी ज्योतिका आणि दोन्ही मुलांसमवेत दिसत आहे. ज्योतिकादेखील अभिनेत्री आहे. तिने सूर्याचे भरभरून कौतुक केले आहे. आनंदित कौटुंबिक क्षणांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 'सिस्टम' (System) चित्रपटाच्या प्रीमियरला सूर्याच्या कुटुंबाने उपस्थिती लावली होती. यावेळेचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या 'सिस्टम' चित्रपटाच्या प्रीमियरला सूर्या आणि ज्योतिका हे त्यांच्या मुलांसोबत दिया सूर्या आणि देव सूर्या एकत्र कार्यक्रमास्थळी दाखल होताना दिसत आहेत. त्यांनी सर्वांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. दुसऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये, पापराझींना एकत्र पोझ देताना दिसताहेत. हे व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंट्स केले. एका नेटकऱ्याने दिया ही अगदी तरुणपणीच्या ज्योतिकासारखी दिसते, तर देव हा हुबेहूब सूर्यासारखा दिसतो.
ज्योतिकाने 'करुप्पू'चे केले भरभरून कौतुक
एका मुलाखतीत, ज्योतिकाने 'करुप्पू' विषयी आणि पती सूर्याच्या अभिनयाबद्दल भरभरून सांगितले. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादानमुळे संपूर्ण टीम आणि तिच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी कार्यक्रमात या फॅमिलीच्या पेहराव्याचे आणि साध्या लूकचे कौतुक केले. तर काहींनी त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रेमळ कुटुंबांपैकी एक म्हटले. गोंडस असणारी मुले म्हणत चाहत्यांनी दिया आणि देवचे कौतुक केले. तर काहींनी अंदाज वर्तवला की, भविष्यात दिया आणि देव हे दोघेही कदाचित चित्रपटसृष्टीत पदार्पण करतील.