Kangana Ranaut | गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या...कंगना यांनी गुपचूप केलं लग्न? खरं काय?

Kangana Ranaut | गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या...कंगना यांनी गुपचूप केलं लग्न? खरं काय?
Kangana Ranaut
Kangana Ranaut secret marriage photos viralय़pudhari photo
Published on
Updated on

अभिनेत्री-राजकारणी कंगना रणौत यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओ ऑनलाईन समोर आल्यानंतर, त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या त्या त्यांच्या विधानामुळे नाही तर लूकमुळे चर्चेत आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये कंगना मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या घातलेल्या दिसतात. ज्यामुळे त्यांनी गुपचूप लग्न केले आहे का, अशी विचारणा नेटकऱ्यांमधून होतेय.

Kangana Ranaut
Dhurandhar 2 Singer | ‘धुरंधर २’ची गायिका Jasmine Sandlas च्या Live Concert मध्ये दुर्घटना; बॅरिकेड कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये कंगना पिच कलर सूट घातलेला दिसतेय. तिच्या गळ्यामध्ये काळ्या मण्यांचे लांब मंगळसूत्र आहे आणि हातात हिरव्या बांगड्या. एका व्हिडिओमध्ये ती आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात एका घरातून बाहेर पडताना दिसते. तिने पापराझींना कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही अथवा संवाद साधला. पण दुसरीकडे मात्र, तिने परिधान केलेले पारंपरिक दागिने आणि लूक यावरून तर्कवितर्क सुरु झाले.

लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियाला वेढले

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले. एका नेटकऱ्याने लिहिले, "मंगळसूत्र?? तिने लग्न केले का?" तर दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया दिली, "कदाचित ती एखाद्या चित्रपटाचे शूटिंग करत असावी." आणखी एकाने म्हटले, "कंगनाला नक्कीच कल्पना होती की कॅमेरा हे दृश्य टिपणार आहे. तो नशीबवान माणूस कोणीही असो, तिच्यासाठी हे खूप छान आहे. तिचे वैवाहिक आयुष्य सुखी होवो, हीच सदिच्छा."

कंगनाच्या गुपचुप लग्नाबद्दल चर्चा सुरु असताना एक वृत्त समोर आले की, कंगना खरंतर तिचा आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. असं म्हटलं जात आहे की, हा व्हिडिओ 'तनू वेड्स मनू ३' वा 'क्वीन २' च्या चित्रपटाच्या सेटवरील आहे. दरम्यान, कंगना यांना स्वत:ला स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्या थोड्या नाराज देखील आहेत.

Kangana Ranaut
Karan Kundrra Proposes Tejasswi Prakash- मराठमोळी तेजस्वीला करण कुंद्राचं Dream Proposal! लवकरच वाजणार सनई चौघडे?

काय म्हणाल्या कंगना राणावत?

कंगना राणावत यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून आपल्या व्हायरल व्हिडिओवर नोट देखील लिहिलं. त्यांचे म्हणणे आहे की- मी प्रत्येक दिवस शहरात आणि जवळपास चित्रपटाचे शूटिंग करत आहे. कुणीतरी माझा कॅरेक्टर मेकअपवाला एक रँडम फोटो क्लिक केला. आता मला खूप सारे फोन कॉल्स येत आहेत. पण विवाहित स्त्री सारखा लूक हा इतका मोठा विषय का आहे? कलाकार तर वगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतात. मी गुपचुपपणे लग्न करणार नाही, मी वचन देते.

आता कंगना लवकरच भारत भाग्य विधातामध्ये दिसेल, जो १२ जूनला थिएटर्समध्ये रिलीज होईल. या चित्रपटात २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचे सेटअप आहे, ज्यामध्ये त्या रुग्णालयाची कहाणी दाखवण्यात येईल, जिथे अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात आले होते. कंगना यांनी या चित्रपटाची निर्मिती केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news