CJP Protest Viral Reel: एक व्हायरल रील अन् 6 लाख फॉलोअर्स... CJPच्या आंदोलनातील एका रिलने बदललं 19 वर्षाच्या अभिनवचं आयुष्य

Abhinav CJP Protest Viral Reel: जंतर-मंतरवरील CJP आंदोलनात कंटेंट शूट करण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय अभिनवचे आयुष्य एका व्हायरल रीलमुळे पूर्णपणे बदललं.
Abhinav CJP Protest Viral Reel
Abhinav CJP Protest Viral ReelPudhari
Published on
Updated on

Abhinav CJP Protest Viral Reel: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल आणि कोणाचं आयुष्य एका रात्रीत कधी बदलून जाईल, याचा काही नेम नाही. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे 19 वर्षीय अभिनवची. काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर अवघे 2,400 फॉलोअर्स असलेल्या या तरुणाचे आज 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. विशेष म्हणजे, हा बदल घडवून आणला तो दिल्लीतील जंतर-मंतरवरील CJP आंदोलनादरम्यान तयार केलेल्या रील्सनी.

फक्त कंटेंट बनवायला गेला... पण नशीब बदललं

ऑनलाइन BCA चे शिक्षण घेणारा अभिनव गेल्या चार वर्षांपासून सोशल मीडियावर कंटेंट तयार करत आहे. इंस्टाग्रामवर तो IsaacIRL या नावाने ओळखला जातो. अभिनव सांगतो की, तो कोणत्याही राजकीय हेतूने आंदोलनात सहभागी झाला नव्हता.

"मी फक्त वातावरण पाहण्यासाठी आणि काही वेगळा कंटेंट शूट करण्यासाठी तिथे गेलो होतो. माझे व्हिडिओ इतके व्हायरल होतील, याची मला अजिबात कल्पना नव्हती." जंतर-मंतरवरील वातावरण, पोलिसांशी संवाद आणि Gen Z शैलीतील त्याने बनवलेल्या रील्स काही तासांतच लाखो लोकांपर्यंत पोहोचल्या.

एका गाण्याने मिळाली ओळख

अभिनवची सर्वाधिक व्हायरल झालेली रील 1964 मधील 'Mr. X in Bombay' या चित्रपटातील 'मेरे महबूब कयामत होगी' या गाण्यावर तयार करण्यात आली होती. त्याच्या मते, हा निर्णय कोणताही राजकीय मेसेज देण्यासाठी नव्हता. फक्त वेगळ्या पद्धतीने कंटेंट सादर करण्याचा प्रयत्न होता. याच वेगळेपणामुळे प्रेक्षकांनी त्याच्या रीलला भरभरून प्रतिसाद दिला.

6 लाख फॉलोअर्स... आणि अचानक अकाउंट बंद

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहीच दिवसांत अभिनवच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्सचा अक्षरशः पाऊस पडला. 2,400 फॉलोअर्स असलेले अकाउंट थेट 6 लाखांहून अधिक फॉलोअर्सपर्यंत पोहोचले. मात्र, लोकप्रियतेसोबत मोठा धक्काही बसला. कॉपीराइट तक्रारीमुळे त्याचे इंस्टाग्राम अकाउंट काही काळासाठी सस्पेंड करण्यात आले.

अभिनव सांगतो, "अकाउंट बंद झाल्यानंतर मी खूप घाबरलो होतो. इतके फॉलोअर्स मिळाल्यानंतर अचानक सर्व काही संपल्यासारखं वाटलं. पण अकाउंट पुन्हा सुरू झाले."

Abhinav CJP Protest Viral Reel
PM Modi Video: 'मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या...'; पंतप्रधान मोदींचा भावनिक इन्स्टाग्राम व्हिडिओ, नेमकं काय म्हणाले?

व्हायरल झाल्यावर आयुष्य बदललं

या यशानंतर अनेक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर्स स्वतःहून त्याच्याशी संपर्क साधू लागले. पूर्वी ज्यांच्यासोबत व्हिडिओ करण्याचं स्वप्न होतं, तेच क्रिएटर्स आता त्याच्यासोबत कोलॅबोरेशन करू लागले.

सुरुवातीला अभिनवची आई आंदोलनात जाण्याच्या निर्णयामुळे खूप घाबरली होती. पोलिस कारवाईत काही अनुचित घडू नये, अशी तिची भीती होती. मात्र, जेव्हा त्याच्या व्हिडिओंना कोट्यवधी व्ह्यूज मिळू लागले, तेव्हा संपूर्ण कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला.

Abhinav CJP Protest Viral Reel
Spider Man BO: 'स्पायडर-मॅन'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! अवघ्या 2 दिवसांत 100 कोटी पार; 11 हॉलिवूड चित्रपटांचे विक्रम मोडले

व्हायरल झाल्यावर घेतला नवा iPhone

व्हायरल झाल्यानंतर सतत येणाऱ्या मेसेज आणि नोटिफिकेशन्समुळे त्याचा जुना फोन हँग होऊ लागला. यामुळे त्याने आईसोबत जाऊन नवा iPhone खरेदी केला, जेणेकरून अधिक चांगले व्हिडिओ तयार करता येतील.

आता पुढचा प्लॅन काय?

अभिनवचे म्हणणे आहे की, पुढेही तो Gen Z प्रेक्षकांसाठी मनोरंजक, रिलेटेबल आणि वेगळा कंटेंट तयार करत राहणार आहे. त्याच्या मते, "हे सर्व इतक्या वेगाने घडलं की पुढचं नियोजन करायलाही वेळ मिळाला नाही. आता माझं एकच ध्येय आहे, सतत दर्जेदार आणि वेगळा कंटेंट तयार करणं."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news