kangana ranaut : कंगनाने एलॉन मस्क यांचे केले अभिनंदन; फॅन्स म्हणाले…

kangana ranaut : कंगनाने एलॉन मस्क यांचे केले अभिनंदन; फॅन्स म्हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्क : एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर कंगना राणावतने त्यांचे अभिनंदन केले आहे. तिने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून फॅन्स कमेंट्सचा पाऊस पाडताहेत. आता कंगनाच्या ट्विटर अकाऊंटची चिंता मिटली, अशी कमेंट फॅन्सनी केलीय. कंगनाने एलॉन मस्क यांचे कौतुक देखील केले आहे. तिने आपल्या इन्स्टा स्टोरीजमध्ये मस्क (kangana ranaut) यांना शुभेच्छा देताना एका फॅनची पोस्ट शेअर केलीय. यामध्ये ट्विटर अकाऊंट रिकव्हरीविषयी सांगण्यात आले आहे. (kangana ranaut)

एलॉन मस्क यांना कंगनाने दिल्या शुभेच्छा

कंगनाच्या एका फॅनने पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि कंगनाच्या ट्विटर अकाऊंट सस्पेंशनचे स्क्रीनशॉट शेअर केले. यानंतर त्याने कॅप्शनमध्ये कंगनाला टॅग करत लिहिलं की- अभिव्यक्ती स्वातंत्र्य लक्षात घेता तुमचे ट्विटर अकाऊंटदेखील रिस्टोर व्हायलं हवं. कंगनाने हे स्क्रीनशॉट्स आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलं आहे.

फॅन्सनी केले असे आवाहन

पोस्टमध्ये लिहिले आहे, 'आशा आहे की तुमचे ट्विटर खातेदेखील लवकरच रिस्टोअर केले जाईल @kanganaranaut.' याशिवाय कंगनाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये एलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल आणि इतर अधिकाऱ्यांना हटवल्याचे वृत्त आहे. यावर कंगनाने क्लॅपिंग इमोजी शेअर केला आहे. ज्यावरून तिने एलॉन यांचे अभिनंदन करत असल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news