Shiv Kumar Khurana: ज्यांनी विनोद खन्नांना हिरो बनवलं, ‘त्या’ निर्मात्याचे निधन | पुढारी

Shiv Kumar Khurana: ज्यांनी विनोद खन्नांना हिरो बनवलं, 'त्या' निर्मात्याचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माते शिवकुमार खुराना यांच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. शिवकुमार खुराना हे पहिले चित्रपट निर्माते होते ज्यांनी विनोद खन्ना यांना हिरो बनवले होते. विनोद खन्ना पूर्वी चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका करत असत. (Shiv Kumar Khurana ) शिवकुमार यांनी अनेक कलाकारांना त्यांच्या चित्रपटात संधी दिली. शिवकुमार खुराना यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घआजारी होते. शिवकुमार यांना मुंबईतील ब्रह्माकुमारी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Shiv Kumar Khurana)

शिवकुमार खुराना हे पहिले चित्रपट निर्माते होते, ज्यांनी अभिनेता विनोद खन्ना यांना नायकाच्या भूमिकेत साईन केले. विनोद खन्ना यांनी खलनायक म्हणून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. पण शिवकुमार यांनी विनोद खन्ना यांना पहिल्या नायकाची भूमिका दिली. हा चित्रपट होता ‘हम तुम और वो’.

‘फर्स्ट लव्ह लेटर’, ‘बदनाम’, ‘बदनसीब’, ‘बे आबरू’, ‘सोने की जंजीर’, ‘इंतकाम की आग’ ‘हम तुम और वो’, ‘दगाबाज’, ‘अंग से अंग लगाले’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

शिवकुमार यांनी जवळपास ३५ वर्षे बॉलिवूडमध्ये काम केले. विनोद खन्ना यांच्याशिवाय त्यांनी त्यांच्या चित्रपटांमधून संजीव कुमारपासून विनोद मेहरा, जॉय मुखर्जी, फिरोज खान आणि अशोक कुमार यांना संधी दिली. शिवकुमार खुराना यांनी १९९४ मध्ये ‘करण’ या चित्रपटाद्वारे विंदू दारा सिंह यांनाही बॉलिवूडमध्ये लॉन्च केले.

Back to top button