Rock Movie Jumanji 3 postponed|पुन्हा सुरू होणार 'जुमांजी'चा थरार! नव्या रिलीज डेटसह रॉकचं कमबॅक; नेमकं काय घडलं?

Rock Movie Jumanji 3 | रॉकचा सुपरहिट चित्रपट 'जुमांजी-३' ची रिलीज डेट टळली, नवी अपडेट काय?
Movie Jumanji 3 poster
Rock Movie Jumanji 3 postponed new date out pudhari photo
Published on
Updated on
Summary

हॉलीवूडचा सुपरस्टार ड्वेन जॉन्सन (The Rock) याचा जगप्रसिद्ध चित्रपट 'जुमांजी'च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार 'जुमांजी ३' च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार होता, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे आणि प्रदर्शनाच्या नियोजनामुळे आता याची तारीख २०२६ च्या अखेरीस निश्चित करण्यात आली आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा ड्वेन जॉन्सन, केविन हार्ट, जॅक ब्लॅक आणि कॅरेन गिलन यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

Rock Movie Jumanji 3 postponed new date revealed

हॉलीवूडमधील सर्वात यशस्वी ॲक्शन-कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'जुमांजी'च्या तिसऱ्या भागाची उत्सुकता जगभरातील चाहत्यांना लागली आहे. ड्वेन जॉन्सन म्हणजेच 'द रॉक' या चित्रपटात पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता चित्रपटाची नव्या तारखेची अपडेट समोर आलीय.

रिलीज डेट का टळली?

हॉलीवूडचा सुपरहिट जुमांजीचे आतापर्यंत दोन भागात रिलीज झाले आहेत. त्यांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. हाच 'लकी' पॅटर्न निर्मात्यांनी पुन्हा एकदा फॉलो करण्याचे ठरवले आहे. आता प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. रिपोर्टनुसार, कोलंबिया पिक्चर्सने ड्वेन जॉनसन आणि केविन हार्ट स्टारर 'जुमांजी ३'ची रिलीज तारीख निश्चित केली आहे. आधी हा चित्रपट ११ डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. 'जुमांजी ३' चित्रपट १८ डिसेंबरला 'ड्यून: पार्ट थ्री' आणि 'एवेंजर्स: डूम्सडे'च्या रिलीज नंतर चित्रपटगृहात रिलीज केला जाईल. हा चित्रपट आता ख्रिसमसच्या निमित्ताने २५ डिसेंबर रोजी रिलीज होईल.

Movie Jumanji 3 poster
Anurag Dobhal |'आयुष्यात पुन्हा चालू शकेन की नाही..' UK07 Rider अनुराग डोभालने दिली हेल्थ अपडेट, व्हिडिओ पाहून फॅन्स चिंतेत

पुन्हा तीच धमाकेदार स्टारकास्ट

या तिसऱ्या भागात केवळ ड्वेन जॉन्सनच नाही, तर त्याच्यासोबत केविन हार्ट, जॅक ब्लॅक आणि कॅरेन गिलन ही प्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी आणि थरार अनुभवण्यासाठी परतणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जॅक कासदान करणार असून, तिसऱ्या भागाची कथा पूर्वीपेक्षा अधिक रंजक असणार आहे. त्यांच्यासोबत पुन्हा एकदा डॅनी डिव्हिटो, निक जोनास, मरिन हिंकल, बेबे न्यूविर्थ, लॅमोर्न मॉरिस आणि रीस डार्बी हे कलाकार असतील. तसेच डॅन हिल्डेब्रँड आणि जॅक ज्यूक्स हे नवीन कलाकारही दिसणार आहेत.

दोन्ही चित्रपटांचे भाग सुपरहिट

रिपोर्टनुसार, ख्रिसमसच्या निमित्ताने डिसेंबरमध्ये 'जुमांजी-३' रिलीज होतोय. जुमांजीची सुरुवात १९९५ मध्ये रॉबिन विलियम्स स्टारर ॲक्शन-ॲडव्हेंचर कॉमेडी चित्रपटातून झाली होती. तो त्याचवर्षी १५ डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. नव्या 'जुमांजी' फ्रेंचायजीचा पहिला चित्रपट २०१७ च्या 'वेलकम टू द जंगल', २० डिसेंबर रोजी रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. चित्रपटाने जगभरात ९६० मिलियन अमेरिकन डॉलरहून अधिक कमाई केली आणि त्याचवर्षी तो पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

Movie Jumanji 3 poster
Ameesha Patel |'धुरंधर २' च्या यशात अमीषा पटेलचा तिखट वार! "आदित्य धरने 'कलाकार' घेतलेत, इन्स्टाग्रामर्स नाही.."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news