

प्रसिद्ध व्लॉगर, युट्यूबर, रायडर अनुराग डोभालने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर दिसतोय. गंभीर दुखापतीमुळे किंवा आरोग्याच्या बिघडलेल्या स्थितीमुळे "मी पुन्हा कधी चालू शकेन की नाही" अशी भीती त्याने व्यक्त केली आहे. त्याच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, त्याचे चाहते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
Anurag Dobhal shared health updates from hospital video viral
'बिग बॉस १७' मधील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय स्पर्धक अनुराग डोभाल सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे. आपल्या मोटोव्लॉगिंगने तरुणाईला वेड लावणाऱ्या अनुरागने नुकतीच एक हेल्थ अपडेट दिली आहे, ज्यामुळे त्याचे चाहते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्याने हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नेमकं काय घडलं?
अनुरागने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो खूपच थकलेला आणि अशक्त दिसत आहे. त्याच्या पायाला किंवा शरीराच्या खालच्या भागाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याला ज्या वेदनेतून जावे लागत आहे, त्याबद्दल तो बोलताना दिसत आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्ट्रेचरवर दिसत आहे. त्याला रुग्णालयाच्या बेडवर अत्यंत वेदनेतून जावे लागत आङे. त्याने व्हिडिओ कॅप्शनमध्ये म्हटलंय- 'मी माझ्या आयुष्यात पुन्हा चालू शकेन किंवा नाही हे सांगता येत नाही.'
त्याच्या कंबरेवर आणि पायावर शस्त्रक्रिया केलेली दिसत. व्हिडिओमध्ये अनुराग म्हणतो, "मला तुम्हाला काही अपडेट्स द्यायचे आहेत, आणि ते म्हणजे, हा उजवा पाय शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे सुन्न झाला आहे. मी तो हलवूही शकत नाही. काय योग्य असेल किंवा कसे, हे मला माहीत नाही."
दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनुरागचे फॅन्स चिंतेत पडले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट करून आपली चिंता व्यक्त केली आहे. तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत.
कुटुंबीयांवर गंभीर आरोप आणि सेल्फ इन्ज्युरी
अनुरागने आपल्या परिवारावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तो ऐंशी स्पीडमध्ये कार घेऊन हायवेवर गेला. जिथे त्याची गाडी पाच वेळा पलटली, यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. गाडी भरधाव असताना तो इन्स्टाग्राम लाईव्ह करून जीवन संपवण्याच्या प्रयत्नात होता. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.