Ameesha Patel |'धुरंधर २' च्या यशात अमीषा पटेलचा तिखट वार! "आदित्य धरने 'कलाकार' घेतलेत, इन्स्टाग्रामर्स नाही.."

Ameesha Patel | 'धुरंधर २' च्या यशात अमीषाचा तिखट वार! "आदित्य धरने 'कलाकार' घेतलेत, इन्स्टाग्रामर्स नाही.."
Ameesha Patel
Ameesha Patel on dhurandhar 2instagram
Published on
Updated on
Summary

अमिषा पाटीलने 'एक्स' (ट्विटर) वर ट्विट करत दिग्दर्शक आदित्य धर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. यावेळी तिने बॉलीवूड निर्मात्यांना एक कडक सल्लाही दिला आहे. बॉलीवूडने आता 'प्रोजेक्ट' बनवण्याऐवजी खऱ्या अर्थाने 'चित्रपट' बनवण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि तिच्या ट्विटमुळे चित्रपटसृष्टीतील कास्टिंग प्रक्रियेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Ameesha Patel on dhurandhar 2 movie and bollywood casting issue

विजय देवरकोंडा, आलिया भट्ट, महेश बाबू, जूनियर एनटीआर, अल्लू अर्जुन, कंगना राणावत सारख्या अनेक सेलेब्सनी धुरंधर २ चे कौतुक केले आहे. यामध्ये आता भर पडलीय ती अमीषा पटेलची. अभिनेत्री अमीषा पटेलने आदित्य धरचा चित्रपट 'धुरंधर २' च्या यशावर टीमचे अभिनंदन केले आहे. बॉलीवूडला 'प्रोजेक्ट' बनवण्याऐवजी 'चित्रपट' बनवण्याचा आणि 'इन्स्टाग्रामर्स'च्या जागी 'ॲक्टर्स'ना कास्ट करण्याचा सल्ला दिला आहे. तिने एक्स अकाऊंटवर ट्विट केले आहे.

Ameesha Patel
Rohit Saraf-Pratibha Ranta Dating? |'द रिवोल्युशनरीज' फेम प्रतिभा रांटा-रोहित सराफने आपलं नातं लपवलंय? डेटिंगच्या चर्चांना उधाण

अमीषाने ट्विटमध्ये काय म्हटलंय?

तिने ट्विटमध्ये म्हटलंय- 'डोळे उघडणारी गोष्ट आहे. इंडस्ट्री धुरंधरचे कौतुक करत आहे हे अप्रतिम आहे आणि हा ब्रँड सर्व प्रशंसांसाठी पात्र आहे. इंडस्ट्रीने हे लक्षात घ्यायला हवं की आदित्यने एक प्रोजेक्ट नाही तर एक चित्रपट बनवला आहे, त्याने कलाकारांना कास्ट केलं आहे, पार्ट्यांमध्ये ट्रेंड करणाऱ्या इन्स्टाग्रामर्सना नाही. प्रोजेक्ट्स बनवणं थांबवा आणि चित्रपट बनवायला सुरुवात करा.'

पण अमिषाने थेट कुणाचेही नाव न घेता निशाणा साधलाय. इंडस्ट्रीमध्ये कास्टिंगवरून अशा गोष्टी घडत आहेत का, हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.

धुरंधर २ ची कास्टिंग मुकेश छाबडाने केली आहे आणि शानदार स्टार सिलेक्शनसाठी खूप कौतुक होत आहे. रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. दानिश पंडोर, राकेश बेदी, मुस्तफा अहमद, गौरव गेरा, मानव गोहिल, नवीन कौशिक, उदयबीर संधू, दानिश इकबाल सहाय्यक कलाकार आहेत.

Ameesha Patel
Anurag Dobhal |'आयुष्यात पुन्हा चालू शकेन की नाही..' UK07 Rider अनुराग डोभालने दिली हेल्थ अपडेट, व्हिडिओ पाहून फॅन्स चिंतेत

धुरंधर २ चे कलेक्शन किती?

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर शानदार बिझनेस करत आहे. चित्रपटाने आतापर्यंत भारतात ५७४ कोटींचा बिझनेस केला असून वर्ल्डवाईड १००० कोटींचा आकडा होण्यासाठी आणखी थोडी कमाई बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news