जान्हवी बनली ‘उमराव जान’

जान्हवी बनली ‘उमराव जान’ www.pudharinews.
जान्हवी बनली ‘उमराव जान’ www.pudharinews.

नवी दिल्ली ः सोशल मीडियावर जास्तीत जास्त सक्रिय राहणार्‍या बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जान्हवी कपूर. सातत्याने पोस्ट शेअर करत ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. अशा या अभिनेत्रीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती 'उमराव जान' या गाजलेल्या चित्रपटातील 'इन आंखाेंं की मस्ती के' या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.

'उमराव जान' या चित्रपटातील मुख्य भूमिकेत रेखा होती. चित्रपटातील गाणी आणि त्यावर रेखाने केलेल्या नृत्याने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. याच चित्रपटातील 'इन आंखाेंं की मस्ती' के या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ जान्हवीने शेअर केला आहे. मात्र तो दोन वर्षांपूर्वीचा असून जान्हवीने तो आता शेअर केला आहे.

रेखाच्या गाण्यावर थिरकण्याचा जान्हवीचा प्रयत्न लोकांना फारच पसंतीस उतरला आहे. यामुळे तिच्या चाहत्यांबरोबरच मनीष मल्होत्रा आणि शनाया कपूर यांनीही जान्हवीच्या व्हिडीओवर हार्ट इमोजी पाठविले आहेत. जान्हवी लवकरच गुड लक जैरी, बवाल और तख्त या आगामी चित्रपटांत दिसणार आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news