hruta durgule engagement : हृता-प्रतिकचा साखरपुडा, फोटो व्हायरल
पुढारी ऑनलाईन
मन उडू उडू झालं आणि फुलपाखरू यासारख्या मालिकांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या हृता दुर्गुळे हिचा साखरपुडा (hruta durgule engagement) मोठ्या धामधुमीत पार पडला. तिचा पती प्रतिक शाहसोबत ती विवाहबध्द होणार आहे. हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाहचे साखरपुड्याचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. (hruta durgule engagement)
तिने केशरी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर प्रतिक शाहने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. अंगठी घालताना हृताने वेडिंग गाऊन परिधान केला होता. तर प्रतिकने सूट घातला होता.
या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांनी एंगेजमेंट रिंगसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, नवीन सुरूवातीची जादू.
तिने शेअर केलेल्या फोटो पोस्टवर भरभरून शुभेच्छां मिळत आहेत. काही नेटकऱ्यांनी तिचे अभिनंदनही केले आहे.
हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले होते. पण, तिला ओळख मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून. तिने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्यांना शूटिंगसाठी १४ -१४ तास काम करावं लागतं. कधीही अवेळी खाता येत नाही. दिवसरात्र मेहनत घ्यावी लागते.
हे कष्टचं फळाला आलं म्हणावं लागेल. म्हणूनचं हृता आता या पदावर आहे. ती सुंदर आहेच. शिवाय तिने दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनेही जिंकून घेतली आहेत. तिचे 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक लोकप्रिय झाले आहे. सध्या ती मन ऊडू ऊडू झाले या मालिकेत काम करते आहे.
कोण आहे तिचा पती प्रतिक शाह?
प्रतिक एक टीव्ही दिग्दर्शक आहे. त्याने बेहद २, तेरी मेरी एक जिंदडी, बहू बेगम, रंग प्यार के ऐसे भी या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह यादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
हेही वाचलं का?

