salman khan
salman khan

‘आरआरआर’बाबत इशारा; ‘बजरंगी भाईजान 2’ची घोषणा

Published on

पुढारी ऑनलाईन

एस. एस. राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' हा चित्रपट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. चित्रपटात रामचरण तेजा, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा एक प्री-रीलिज इव्हेंट मुंबईत नुकताच पार पडला. या कार्यक्रमात सलमान खानही उपस्थित होता.

लागलीच सलमानने फिल्ममेकर्सना एक इशाराही देऊन टाकला आहे. 'आरआरआर'च्या रीलिजनंतर फिल्ममेकर्सनी चित्रपट रीलिज करू नयेत. चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलावे, तरच या चित्रपटाशी स्पर्धेतून ते वाचू शकतील, असे सलमान म्हणाला.

दरम्यान, या कार्यक्रमात सलमानने त्याच्या 'बजरंगी भाईजान 2' या चित्रपटाची घोषणाही केली. या चित्रपटाची कथा पहिल्या 'बजरंगी भाईजान'चे लेखक आणि एस. एस. राजामौली यांचे वडील विजेंद्र प्रसाद लिहिणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news