‘अजून झोपलो नाही, सकाळ झाली’ – ८३ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांना नेमकं कशाची चिंता? पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये काळजी

बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत जोडलेले असतात.
Amitabh Bachchan Apologies
अमिताभ बच्चनInstagram
Published on
Updated on

"Haven't slept yet; it's morning" – What exactly is worrying 83-year-old Amitabh Bachchan? Fans concerned after seeing the post

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत जोडलेले असतात. आपल्या कामाबद्दल तसेच आयुष्यातील विविध अनुभव ते नियमितपणे शेअर करत असतात. चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ काम करूनही आजही ते आपल्या कामाबाबत अत्यंत सजग आहेत.

Amitabh Bachchan Apologies
Amitabh Bachchan health update | अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर, खरंच रुग्णालयात दाखल केलंय का? सत्य काय?

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये एक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्यांनी आपल्या कामाबद्दलची चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, केलेले काम आणखी चांगले होऊ शकले असते असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी पुन्हा ते काम करण्याची परवानगी घेतली आणि ते नव्याने केले. मात्र, ते खरोखर अधिक चांगले झाले की नाही, याबाबत ते अजूनही साशंक आहेत.

त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले :

“असं काही नाही... कामाचे काही क्षण.

जे केलं होतं, ते आणखी चांगलं होऊ शकलं असतं असं वाटलं. परवानगी मिळाली म्हणून पुन्हा केलं. आता ते खरंच चांगलं झालं की नाही, हे तर तेच सांगतील. याच विचारात अजूनपर्यंत झोपलो नाही आणि सकाळ झाली.”

त्यांच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ८३ व्या वर्षीही अमिताभ बच्चन आपल्या कामाबाबत इतके समर्पित आहेत आणि सतत स्वतःला अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत आहेत, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Amitabh Bachchan Apologies
Salman Khan Video: मध्यरात्री सलमान खान संतापला; हिंदुजा रुग्णालयाबाहेर पापाराझींना सुनावलं, रात्री 3 वाजता सलग 4 पोस्ट

याशिवाय बिग बी यांनी आणखी एका पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी १८ जूनच्या रात्रीपासून सलग काम केले आणि १९ जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यानंतर त्यांनी विश्रांती घेण्याची गरज असल्याचे नमूद केले. आणखी एक काम स्वीकारल्यास पुढील दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक बिघडेल, त्यामुळे आता थांबून आराम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

काही काळापूर्वी अमिताभ बच्चन त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे चर्चेत होते. त्यावेळी त्यांनी एका दिवसात तब्बल १२ शूट पूर्ण केल्याचेही सांगितले होते. यावरून त्यांच्या कामावरील निष्ठा आणि मेहनतीची जाणीव होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अमिताभ बच्चन लवकरच दिग्दर्शक Nag Ashwin यांच्या Kalki 2898 AD या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागात त्यांनी ‘अश्वत्थामा’ ही प्रभावी भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता सिक्वेलमध्येही ते पुन्हा एकदा अश्वत्थामाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news