

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर काही नसल्याचं सांगितलं जात आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांनी नियमित पोस्टही शेअर केल्या आहेत. त्यामुळे पसरत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन चाहत्यांना करण्यात येत आहे.
Amitabh Bachchan hospitalisation news health latest updates
बॉलिवूडचे शहंशहा अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांची चिंता वाढली होती. पाहता पाहता हे वृत्त पसरले आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरु केल्या. पण, आता त्यांच्या प्रकृतीबाब मोठी बातमी समोर आलीय. त्यांना खरंच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे का, याबाबतचं सत्य समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
अमिताभ बच्चन यांनी रुटिन चेकअपसाठी नानावटी रुग्णालयाला भेट दिली होती. त्यावेळी एका पत्रकाराने वृत्त दिले की, अमिताभ बच्चन यांना शनिवार, १६ मे पासून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाच्या त्रासामुळे ते गेल्या तीन दिवसांपासून ए-विंग व्हीआयपी एन्क्लोजरमध्ये राहत होते. 'कुली' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर बच्चन यांना पोटाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. इतकेच नाही तर या वृत्तात अभिषेक बच्चन रुग्णालयात स्पॉट झाल्याचेही सांगण्यात आले.
रिपोर्टनुसार, अशी माहिती समोर आली की, बच्चन यांनी शनिवारी नानावटी रुग्णालयाला भेट दिली होती. मात्र ती एक नियमित तपासणी होती. बच्चन दर महिन्याला जाऊन रुटिन चेकअप करतात आणि घरी परततात. ते रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त खोटे आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. शनिवारी रुग्णालयात गेल्यानंतर तपासणी करून ते घरी परतले होते. मीडिया रिपोर्टनुसार असेही वृत्त समोर आले की, 'दुसऱ्या दिवशी त्यांना जलसा ते जनकपर्यंत गाडी चालवतानाही पाहिले गेले होते.'
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग व्हायरल..
बच्चन यांच्या प्रकृतीविषयी चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर देखील लिहिले. ते म्हणाले-
"चील जब होवे पीस तो भैया, तोते बोलन सुरु करें
इर बीर फत्ते, कहन, चल हमऊ, पिलावे सुरु करें !!!!
बाजरे दी रोटी खादी, फू पडियां दा, सागरे
मुंह में डालन लगे जैसे , बोलेंगे काग रे !!!!!
एक तर ‘हिल’ भैया की पढ़ाई का दर्पण; औ दूसर विलिंग्टन की याद !!"
बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर फोटो टाकत म्हटले होते - "मी शुभचिंतकांना भेटायला घरातून जातो. कर्मचारी, सुरक्षा आणि पोलीस सांगतात की, सज्ज व्हा आणि मी चालत असताना मनात धाकधूक असते..ते तिथे असतील का..ते माझे स्वागत करतील का.. की वैतागतील..?? आणि मग मला टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. समोर उभे असलेल्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहून होणारा आनंद.. ....परमेश्वराची स्तुती असो.....साष्टांग प्रणाम"
आगामी प्रोजेक्ट
बच्चन सध्या 'कल्की २८९८ एडी' च्या सिक्वेलसाठी शूटिंग करत आहेत. यानंतर ते रिभू दासगुप्ता दिग्दर्शित 'सेक्शन ८४' या कोर्टरूम ड्रामामध्ये दिसणार आहेत. त्यांनी नुकताच 'कौन बनेगा करोडपती'चा १७ वा सीझन पूर्ण केला आहे.