

पुढारी ऑनलाईन
'जबरदस्त', 'तीन बायका फजिती ऐका', 'ढोलकी', 'मर्डर मेस्त्री', 'द शॅडो', 'कॅरी ऑन देशपांडे' यासारखे हिट चित्रपट देणाऱ्या मानसी नाईक (manasi naik) हिचा आज वाढदिवस. रिक्षावाला आणि बाई वाड्यावर या यासारखी हिट गाणी करून तिन अक्षरश: धुमाकूळ घातला. मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मानसी नाईक (manasi naik) डान्सिंग क्वीन आहे. पुण्याच्या मानसीला खरंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न करायचं होतं. पण… वाचा तिच्याविषयी या खास गोष्टी.
मानसीचा जन्म २ फेब्रुवारी, १९८७ रोजी पुण्यात झाला. मानसी विज्ञान शाखेची पदवीधर आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने शिक्षण पूर्ण केले. सुंदर दिसणाऱ्या मानसीचे डोळे आणि सौंदर्य पाहून तिला ऐश्वर्या रायसारखी हुबेहुब दिसणारी अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. आकर्षक व्यक्तीमत्त्व, सौंदर्य आणि नृत्याने तिने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. 'जबरदस्त', 'तीन बायका फजिती ऐका', 'ढोलकी', 'मर्डर मेस्त्री', 'द शॅडो', 'कॅरी ऑन देशपांडे' या चित्रपटांमधून तिने वेगवेगळ्या धमाल भूमिका साकारल्या आहे. 'जलसा' या चित्रपटात तिने 'बाई वाड्यावर या' या गाण्यातून निळू फुलेंना श्रद्धांजली दिलीय. हे गाणेदेखील खूप लोकप्रिय ठरले होते.
मानसीने जेव्हा अविवाहित होती. त्यावेळी तिला तिच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं होतं. तिने उत्तर दिलं होतं की, जर रणवीर सिंह तयार असेल तर मी लग्न करण्यासाठी तयार आहे. मानसी रणवीर सिंहची खूप मोठी फॅन आहे. रणवीरचा अभिनय, नृत्यशैली तिला खूप आवडते. मानसीने बॉक्सर प्रदीप खरेराशी तिनं लग्न केलं आहे
मानसीने २०२० मध्ये आपल्या रिलेशनशीप विषयी सांगितलं होतं. तिने तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी बॉक्सर मानसीनं प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर केला होता. मी स्वतःलाच दिलेलं हे सर्वात मोठं बर्थ डे गिफ्ट आहे, असं तिने या फोटोला कॅप्शन दिली होती. यानंतर वर्षभराने मानसीनं प्रदीप खरेराशी लग्नही केलं.